अनुराग कश्यप बॉलिवूडसह मुंबई सोडणार, धक्कादायक कारण आलं समोर

On: March 6, 2025 3:17 PM
Anurag Kashyap
---Advertisement---

Anurag Kashyap l बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी बॉलिवूड आता विषारी (Toxic) झाल्याचा दावा करत मुंबई सोडून बंगळुरूला (Bangalore) स्थलांतर करण्याचे ठरवले आहे.

बॉलिवूड सोडण्यामागे काय आहे कारण? :

‘गँग्स ऑफ वासेपूर’ (Gangs of Wasseypur) आणि ‘ब्लॅक फ्रायडे’ (Black Friday) यांसारख्या अनेक हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केलेल्या अनुराग कश्यप यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील सध्याच्या परिस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. एका जुन्या मुलाखतीत त्यांनी “बॉलिवूडमध्ये सर्जनशीलता संपत चालली आहे आणि चित्रपट फक्त ५००-८०० कोटींचे कमावण्यासाठी बनवले जात आहेत” असे सांगितले होते.

अनुराग कश्यप म्हणाले, “फिल्म इंडस्ट्रीतील लोकांपासून दूर राहण्याची माझी इच्छा आहे. येथील प्रत्येक जण मोठ्या बजेटच्या चित्रपटांमागे धावत आहे. मला साऊथच्या चित्रपटसृष्टीतील निर्मात्यांचा हेवा वाटतो, कारण ते प्रयोगशील आहेत आणि तिथे क्रिएटिव्हिटीला अधिक महत्त्व दिले जाते.”

Anurag Kashyap l बंगळुरूला का स्थलांतर? :

अनुराग कश्यप यांनी आपल्या मुलाखतीत स्पष्ट केले की, “मी पुढच्या वर्षी मुंबई सोडणार आहे. बॉलिवूडमध्ये सर्जनशील वातावरण हरवत चालले आहे, त्यामुळे मी बंगळुरूला स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.”

त्यांच्या या निर्णयामुळे चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली असून, हिंदी चित्रपटसृष्टीतील बदलत्या वातावरणावर चर्चा सुरू झाली आहे.

News title : Anurag Kashyap to Leave Bollywood & mumbai

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now