इटलीतील आलिशान क्रुझवर होणार अनंत-राधिकाचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा; पाहा PHOTO

On: May 29, 2024 3:50 PM
Anant Ambani-Radhika Merchant second pre-wedding photo goes viral
---Advertisement---

Anant Ambani-Radhika Merchant | भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग सोहळा काही महिन्यांपूर्वीच जामनगर येथे पार पडला. 1 ते 3 मार्च दरम्यान पार पडलेल्या या प्री-वेडिंग सोहळ्यात बॉलिवूड सेलिब्रिटी ते आंतरराष्ट्रीय दिग्गजांनी हजेरी लावली होती.

जामनगर येथे झालेल्या या सोहळ्यात पाण्यासारखा पैसा अंबानींनी खर्च केला होता.अगदी जेवणापासून ते सजावटीपर्यंत प्रत्येक गोष्टींची यावेळी मीडियामध्ये जोरदार चर्चा झाली. आता अनंत आणि राधिका यांचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा पार पडणार आहे. इटलीतील एका आलिशान क्रुझवर हा सोहळा होतोय.

अनंत-राधिका यांच्या दुसऱ्या प्री-वेडिंगचे फोटो व्हायरल

आजपासून अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंग (Anant Ambani-Radhika Merchant ) सोहळ्याला सुरुवात झाली आहे. 1 जूनपर्यंत हा सोहळा होणार असून विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी यासाठी उपस्थित राहणार आहेत. अनंत आणि राधिका यांचा प्री-वेडिंग सोहळा हा एका आलिशान क्रुझवर इटली ते फ्रान्स असा प्रवास करत होणार आहे. बॉलीवूड मधील अनेक दिग्गज या सोहळ्यासाठी इटलीला रवाना झाले आहेत. त्यात अभिनेता सलमान खान ,रणबीर कपूर, आलिया भट अशा अनेक सेलिब्रिटींचा सहभाग आहे. या क्रुझवर 800 पाहुण्यांसाठी 600 कर्मचारी क्रूझवर उपलब्ध राहणार आहेत.

अनंत आणि राधिका यांच्या या दुसऱ्या प्री-वेडिंग सोहळ्याचे फोटो आता सोशल मीडियावर तुफान वायरल होताना दिसत आहेत. ओरी याने याचे काही फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. काही क्षणातच हे फोटो वाऱ्यासारखे व्हायरल झाले असून यावर नेटकरी देखील प्रतिक्रिया देत आहेत.

Anant Ambani-Radhika Merchant

बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटी लावणार हजेरी

बॉलिवूड सेलिब्रिटींचा खास मित्र ओरहान अवतारमणी उर्फ ओरीने क्रूझवरील फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आलिशान क्रूझ पाहायला मिळत आहे. पहिल्या फोटोमधून समुद्राच्या लाटा आणि मावळतीचा सूर्याचं अप्रतिम दृश्य दिसत आहे. याशिवाय क्रूझच्या आतमध्ये एका टेबलवर हुक्का पॉट, काचेचे ग्लास ठेवलेले पाहायला मिळत आहेत.

Anant Ambani-Radhika

दुसऱ्या फोटोमध्ये बेडरुम दिसत आहे. या बेडरुमच्या खिडकीतून इटलीचा निळाशार समुद्र पाहायला मिळत आहे. हा फोटो शेअर करत ओरीने “परफेक्ट मॉर्निंग”, असं लिहिलं आहे. या फोटोंनी (Anant Ambani-Radhika Merchant ) आता सोशल मीडिया वरती धुमाकूळ घातला आहे.

News Title –  Anant Ambani-Radhika Merchant second pre-wedding photo goes viral

महत्वाच्या बातम्या-

नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं, शेतकऱ्याने ‘इतक्या’ लाखांना खरेदी केला बैल

पुणे अपघात प्रकरणात ट्विस्ट; ‘मी शांत बसणार नाही, सगळी नावं..’, अटकेत असलेल्या डॉक्टरचा मोठा इशारा

“…याचा अर्थ असा होत नाही की मी इस्लामचा स्वीकार करेल”, गौरी खानचं मोठं वक्तव्य

‘ब्लड सॅम्पल बदलणाऱ्या डॉक्टरच्या…’; सुषमा अंधारेंचा खळबळजनक दावा

स्वतःच्या घरातील 8 जणांना कुऱ्हाडीने… बातमी वाचून काळजाचा थरकाप उडेल

Join WhatsApp Group

Join Now