Anant-Radhika Pre-Wedding l अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या दुसऱ्या प्री वेडिंगची सर्वत्र चर्चा रंगली आहे. उद्यापासून म्हणजेच बुधवार, 29 मेपासून या प्री वेडिंगला सुरूवात होणार आहे. हा एक अतिशय भव्य कार्यक्रम अनार आहे. या कार्यक्रमात पाहुण्यांना इटली आणि दक्षिण फ्रान्समधील आलिशान क्रूझवर नेले जाणार आहे. अनंत-राधिकाचा दुसर प्री-वेडिंग फंक्शन चार दिवस चालणार आहे ज्यामध्ये एकूण 4380 किलोमीटरचे अंतर कापले जाणार आहे.
7000 कोटी रुपयांच्या विशेष जहाजावर कार्यक्रम आयोजित केला जाणार :
ज्या क्रूझ शिपवर हे दुसरे प्री-वेडिंग फंक्शन होणार आहे, त्याचे नाव सेलिब्रिटी असेंट आहे. हे एक अतिशय आलिशान क्रूझ जहाज आहे ज्यात पंचतारांकित रिसॉर्टसारख्या सुविधा आहेत. हे क्रूझ फ्रान्सच्या आघाडीच्या जहाज बांधणी कंपनी चँटियर्स डी आय’अटलांटिक सेलेब्रिटीने बनवले आहे. या जहाजाची किंमत सुमारे 90 कोटी डॉलर म्हणजे 7,475 कोटी रुपये आहे.
जहाजाची लांबी 327 मीटर आणि रुंदी 39 मीटर आहे. यामध्ये 3,950 प्रवासी एकाच वेळी प्रवास करू शकतात. या जहाजावर, पाहुणे लॅप पूल, डॉट टब पूल, सूट बेडरूम, ड्रेसिंग रूम, लिव्हिंग एरिया आणि जेवण अशा अनेक सुविधांचा आनंद घेऊ शकतात.
Anant-Radhika Pre-Wedding l कार्यक्रमाचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या :
या नेत्रदीपक प्री-वेडिंग सोहळ्याची सुरुवात 29 मे रोजी इटलीच्या पालेर्मो पोर्ट येथून क्रूझच्या प्रस्थानाने होईल. चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी पाहुण्यांसाठी स्वागत, भोजन आणि तारांकित रात्री कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल.
दुसऱ्या दिवशी, सर्व पाहुणे रोम शहराच्या सौंदर्याचा आनंद घेऊ शकतील. यासोबतच क्रूझवर भव्य डिनर आणि टोगा पार्टीचे आयोजन करण्यात येणार आहे. तिसऱ्या दिवशी सर्व पाहुणे फ्रान्सच्या कान्स शहरात पोहोचतील आणि येथे पुन्हा क्रूझवर भव्य पार्टीचे आयोजन केले जाईल. कार्यक्रमाच्या चौथ्या आणि शेवटच्या दिवशी, पाहुणे पोर्टोफिनो, इटली येथील टूरचा आनंद घेतील.
अनंत आणि राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंग फंक्शनला उपस्थित राहण्यासाठी देशातील अनेक प्रसिद्ध व्यक्ती इटलीला रवाना होत आहेत. चार दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात एकूण 800 पाहुणे सहभागी होतील, ज्यात 300 व्हीव्हीआयपी पाहुण्यांचा समावेश आहे. यामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचीही नावे आहेत. रणवीर सिंग, रणबीर कपूर, आलिया भट्ट, शाहरुख खान, सलमान खान आदी अनेक दिग्गज अभिनेत्यांची नावे यादीत समाविष्ट आहेत.
News Title – Anant Ambani Radhika Merchant Pre-Wedding
महत्त्वाच्या बातम्या
अजितदादानंतर आता पाण्यावरून भाजप नेत्याचे विधान, “मी काय फूक मारून…”
महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार? हवामान खात्याने वर्तवला अंदाज
पुण्यात घडली थरारक घटना; प्रियकराने संतापाच्या भरात कार अंगावर घातली अन् पुढं घडलं भयंकर
पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांना कधी मिळणार?






