अजित पवार गटातील नेत्याकडून अनिल परब यांचं कौतुक!

On: July 12, 2024 1:21 PM
Amol Mitkari praised Anil Parab
---Advertisement---

Amol Mitkari | राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये फुट पडून पक्षाचे आता दोन गट पडले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात काही नेते तर शरद पवार गटात काही जण आहेत. फुट पडल्यानंतर या दोन्ही गटाकडून एकमेकांवर काही न काही कारणांवरून निशाणा साधला जातो. अजितदादा सध्या सत्तेत असल्याने त्यांच्या गटाकडून मविआवरही टीका केली जाते.

अमोल मिटकरी यांनी केलं अनिल परब यांचं कौतुक

त्यातच राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तर महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये प्रचंड खडाजंगी झाल्याचं दिसून आलं. मराठा आरक्षण, शेतकरी प्रश्न, ड्रग्स प्रकरण, अपघात सत्र या प्रश्नांवरून मविआने सत्ताधारी नेत्यांना चांगलंच घेरल्याचं दिसून आलं. अशात अजित दादा गटातील एका नेत्याने (Amol Mitkari ) थेट उद्धव ठाकरे गटातील नेत्याचं कौतुक केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

आमदार अमोल मिटकरी यांनी उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचं कौतुक करणारं ट्वीट केलं आहे. या ट्वीटची सध्या राज्यात जोरदार चर्चा आहे. याबाबत आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. तसेच अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

अमोल मिटकरी यांचं ट्वीट चर्चेत

“विधान परिषदेतील अत्यंत अभ्यासु व आक्रमक व तितकीच अभ्यासु मांडणी करणारे एक सन्माननीय सदस्य म्हणजे श्री अनिल परब साहेब.त्यांचा सभागृहातील एकंदर अभ्यास, विधिमंडळातील विविध आयुधांचा कसा वापर करायचा? विधेयकावर कसे बोलायचे? इ.त्यांचे ज्ञान अद्भुत आहे.”, असं ट्वीट अमोल मिटकरी (Amol Mitkari ) यांनी केलं आहे.

अमोल मिटकरी यांनी अनिल परब यांचं कौतुक केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकीकडे सभागृहात विरोधक विविध प्रश्नावरून सत्ताधाऱ्यांना घेरत असताना मिटकरी यांनी मविआ नेत्याचं कौतुक केलं आहे. त्यांचं हे ट्वीट आता प्रचंड चर्चेत आलंय.

News Title : Amol Mitkari praised Anil Parab

महत्त्वाच्या बातम्या-

आठवड्याच्या शेवटी सोनं महागलं; 10 ग्रॅमसाठी आता..

देशात ‘या’ चारचाकी वाहनांची खरेदी करण्यासाठी मिळणार सवलत!

दारू घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना कोर्टाकडून मोठा दिलासा; अखेर..

आज ‘या’ राशीच्या लोकांचं नशीब फळफळणार, पैसा अन् सन्मान भरभरून मिळणार

शहाजीबापू रुग्णालयात तर गणपत गायकवाड जेलमध्ये; महायुतीचं मतांचं गणित बिघडणार?

Join WhatsApp Group

Join Now