पदातून मुक्तता करण्याची मागणी करणाऱ्या फडणवीसांना अमित शहांचा फोन!

On: June 6, 2024 2:27 PM
BJP candidate List
---Advertisement---

Devendra Fadnavis | लोकसभा निवणुकीत भाजपला उत्तर प्रदेश तसेच महाराष्ट्रात मोठा फटका बसला आहे. 2014 आणि 2019 मध्ये महाराष्ट्रात महायुतीचे 40 पेक्षा जास्त खासदार निवडून आले होते. मात्र या निवडणुकीत हा आकडा फक्त 17 आहे.

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा निकाल हा भाजपसाठी धक्कादायक ठरला आहे. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पराभवाची जबाबदारी घेत बाजूला होण्याची विनंती केल्याने प्रदेश भाजपसह राज्य सरकारमध्येही खळबळ उडाली.

फडणवीसांना अमित शहांचा फोन

देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी महायुतीच्या पराभवाची पूर्ण जबाबदारी घेत पदातून मुक्तता करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पदातून मुक्तता करण्याची मागणी करतानाच पक्ष संघटनेसाठी वाहून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

देवेंद्र फडणवीस यांची मागणी केंद्रीय नेत्यांकडून मान्य केली जाते का? याकडे लक्ष लागून राहिलं आहे. अशात अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाल्याची माहिती आता समोर आली आहे.

देेवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी तसेच अमित शाहांची भेट घेणार

देेवेंद्र फडणवीस ते दिल्लीत जाणार असून नरेंद्र मोदी तसेच अमित शाह यांची भेट घेणार आहेत. मात्र त्यापूर्वीच आज सकाळी अमित शाह यांनी स्वत: फडणवीस यांना फोन करून त्यांच्याशी चर्चा केली.

उद्या भाजपची संसदीय पक्षाची बैठक आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार असल्याने त्यावेळी शाह यांच्याशी भेट होण्याची शक्यता आहे. या बैठकीत अमित शाह या हे देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करतील, अशी माहिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

नवरा भाजपकडून, घटस्फोटित बायको तृणमूलकडून उभी, पाहा कुणाचा झाला विजय

पवार घराण्याला स्विकारावा लागला तिसरा पराभव, पाहा तिघांची नावं

सासऱ्याच्या विरोधात उभ्या होत्या दोन सुना, अत्यंत धक्कादायक लागला निकाल

पिपाणीमुळे तुतारीला मोठा फटका!, समोर आलेले आकडे अत्यंत धक्कादायक

पराभव लागला जिव्हारी; आणखी एका भाजप नेत्याने दिला राजीनामा

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now