अमरावतीतून मोठी बातमी समोर; नवनीत राणांवर कॉँग्रेसची आघाडी

On: June 4, 2024 10:01 AM
Amarvati Lok Sabha Result
---Advertisement---

Amarvati Lok Sabha Result | अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार नवनीत राणा या सध्या पिछाडीवर आहेत. तर, महाविकास आघाडीकडून कॉँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे सध्या आघाडीवर आहेत.

अमरावती लोकसभा मतदारसंघ  हा चर्चेतला मतदारसंघ राहिला आहे. येथे महायुतीमधीलच बच्चू कडू यांनी थेट भाजपला आव्हान दिलं आहे. नवनीत राणांची उमेदवारी बच्चू कडू यांना चांगलीच खटकली होती. त्यामुळे इथे त्यांनी थेट आपला उमेदवार उभा केला. बच्चू कडू यांनी दिनेश बूब यांना लोकसभेचं तिकीट दिलं. त्यामुळे महायुतीची मोठी पंचाईत झाली होती.

कॉँग्रेसचे बळवंत वानखेडे आघाडीवर

आज देशातील 542 जागांचे निकाल (Amarvati Lok Sabha Result) जाहीर होणार आहे. देशात 1,224 मतमोजणी केंद्रांत मतमोजणी पार पडणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.आता हाती आलेल्या कलानुसार अमरावतीमध्ये सध्या भाजप पिछाडीवर असल्याचं चित्र आहे.

नवनीत राणा vs बळवंत वानखेडे

दुसरीकडे देशात एनडीए सध्या 291 जागांवर आघाडीवर आहे. तर, इंडिया आघाडी 215 जागांवर आहे. महाराष्ट्रात इतर मतदार संघाबद्दल बोलायचं झाल्यास बीड, अमरावती, शिरूर , कोल्हापूर येथे मविआ आघाडीवर आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत आहे.

News Title-  Amarvati Lok Sabha Result

महत्वाच्या बातम्या-

अहमदनगरमधून मोठी अपडेट्स समोर; पाहा कोण आघाडीवर?

राज्यातील 10 हायव्होल्टेज लढती, कोण मारणार बाजी?

शेअर बाजारात मोठी उलथापालथ; निकालापूर्वीच मार्केट जोरदार आपटलं

बीडमध्ये तब्ब्ल ‘इतक्या’ फरकाने बजरंग सोनावणे आघाडीवर

मोठी गुड न्यूज! निकालापूर्वीच सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजच्या किंमती 

Join WhatsApp Group

Join Now