Allu Arjun | ‘पुष्पा 2 द रुल’ या चित्रपटाने सिनेसृष्टीत प्रचंड धुमाकूळ घातला. मात्र या चित्रपटाचा प्रीमियर 4 डिसेंबरला हैदराबाद येथील ‘संध्या’ थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. मात्र यावेळी एका महिलेचा मृत्यू झाला तर तिचा आठ वर्षांचा मुलगा जखमी झाला. मात्र या घटनेचे पडसाद अजूनही उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर अल्लू अर्जूनला आज (24 डिसेंबर) रोजी पोलिस स्टेशनमध्ये चौकशीसाठी बोलवलं असताना अल्लू अर्जूनने काही खुलासे केले आहेत.
नेमकं काय घडलं?
(22 डिसेंबर) रोजा हैदराबाद या ठिकाणी असलेल्या अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) घरावर हल्ला करण्यात आला होता. तसंच यावेळी घरात घुसून तोडफोड करण्यात आली आहे. मात्र यावेळी अल्लू अर्जुनने या प्रकरणात आपला काहीही दोष नाही जे घडलं ते खेदजनक आहे, त्यासाठी मी माफीही मागतो, असं देखील म्हटलं आहे. परंतु, आता या घटनेनंतर अल्लू अर्जुन (Allu Arjun) विरोधात उद्रेक पाहायला मिळत आहे. दरम्यान अल्लूला पोलिस चौकशीसाठी घेऊन गेले असताना, त्याला काही प्रश्न विचारण्यात आले त्याची यादी देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
संध्या थिएटरमधअये येऊ नये असे तुम्हाला आधी तुम्हाला सांगण्यात आले होते का? तुम्हाला माहीत आहे का की तुमच्या प्रीमियरच्या संदर्भात पोलिसांची परवानगी नव्हती? संध्या थिएटरच्या प्रीमियर शोमध्ये येण्याची परवानगी तुम्हाला मिळाली होती का? तुम्हाला याच्याबद्दल काही माहित नव्हतं का? किती बाऊन्सरची तुम्ही व्यवस्था केली?
#WATCH | Hyderabad, Telangana: Actor Allu Arjun leaves from his residence in Jubilee Hills
According to Sources, Hyderabad police have issued a notice to actor Allu Arjun, asking him to appear before them in connection with the Sandhya theatre incident pic.twitter.com/S4Y4OcfDWz
— ANI (@ANI) December 24, 2024
अल्लू अर्जून काय म्हणाला?
पोलिस चौकशी दरम्यान, अल्लू अर्जून म्हणाला महिलेच्या मृत्यूबद्दल मला दुसऱ्यादिवशी माहिती मिळाली. तसेच अल्लू अर्जुनची एसीपी रमेश आणि सीआय राजू यांच्या देखरेखीखाली चौकशी केली जात आहे. यावेळी अल्लू अर्जुनसोबत त्याचे वकील अशोक रेड्डीही होते. महत्त्वाचं म्हणजे अल्लू अर्जुनच्या टीम हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये नेऊन पुष्पा-२ च्या प्रीमियर शोदरम्यान चेंगराचेंगरी झाली होती त्याचा सीन चौकशीचा भाग म्हणून रिक्रिएट करण्यात येणार असल्याचंही म्हटलं जातं.
News Title : allu arjun talks about the incident happened during primer show
महत्त्वाच्या बातम्या-
1500 की 2100; लाडक्या बहिणींच्या खात्यावर किती रुपये जमा होणार?
‘बंदोबस्त करणार’! मंत्री होताच नितेश राणेंनी दिला इशारा?
‘महाजन साहेब मलाही पक्षात घ्या’, ठाकरेंचा ‘हा’ बडा नेता भाजपाच्या वाटेवर?






