अक्षय शिंदेचा पोलिसांसोबतचा व्हिडीओ आला समोर!

On: September 24, 2024 1:49 PM
Akshay Shinde Encounter
---Advertisement---

Akshay Shinde Encounter l 13 ऑगस्ट 2024 रोजी बदलापूर येथील शाळेत दोन मुलींवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या प्रकरणी शाळेतीलच सफाई कर्मचारी अक्षय शिंदेने या चिमुरड्यांवर अत्याचार केला आहे. त्यावेळी पोलिसांनी आरोपी अक्षय शिंदेला अटक केली होती. तसेच ही संपूर्ण घटना समोर येताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. अशातच आता आरोपी अक्षयला तुरुंगातून पोलीस ठाण्यात नेले जात असताना अक्षयने गोळीबार केला पण त्यावेळी त्याचा मृत्यू झाला. मात्र, या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

पोलिसांनी अक्षयचा एनकाउंटर केला का? :

बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याने गोळीबार केल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. मात्र आता आरोपी अक्षय शिंदेला पोलीस ठाण्यात नेत असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, आरोपी अक्षय शिंदेच्या हाताला बेड्या घालण्यात आल्या होत्या, तसेच त्याच्या तोंडावर काळा बुरखा देखील घातलेला आहे.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अक्षय शिंदे च्या हातात बेड्या, तोंडावर काळा बुरखा व त्याला नीट चालताही येईना. तरी देखील त्याने पोलिसांवर हल्ला कसा केला आणि मग पोलिसांनी त्याचा एनकाउंटर केला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच पोलिसांनी दिलेल्या माहितीवर कोण विश्वास ठेवणार? तर न्यायालयात देखील हा मुद्दा टिकणार नाही असं बोललं जात आहे.

Akshay Shinde Encounter l या संपूर्ण प्रकरणाबाबत पोलिसांनी काय सांगितले? :

यासंदर्भात एका अधिकाऱ्याने सांगितले की, शाळेत सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या अक्षय शिंदेला त्याच्या दुसऱ्या पत्नीने दाखल केलेल्या दुसऱ्या गुन्ह्याच्या तपासासंदर्भात सोमवारी तळोजा कारागृहातून बदलापूरला नेले जात होते. त्यानंतर त्यांनी एका पोलिसाचे रिव्हॉल्व्हर हिसकावून गोळीबार केला. याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही गोळीबार केला. तसेच या घटनेनंतर त्याला कळव्यातील रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याचा मृत्यू झाला.

News Title : Akshay Shinde Encounter

महत्वाच्या बातम्या –

अक्षय शिंदेवर गोळी चालवणारा पोलीस ऑफीसर कोण?, महत्त्वाचं कनेक्शन समोर

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट!

“अक्षयचा एन्काऊंटर पैसे घेऊन केला, त्याच्या खिशात..”, वडिलांचा खळबळजनक आरोप

बिग बॉस मराठी 5 चा महाअंतिम सोहळा ‘या’ दिवशी पार पडणार!

“मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी अक्षयचा एन्काऊंटर”; संजय राऊत यांचा गंभीर आरोप

 

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now