महायुतीचं टेन्शन वाढलं! अजितदादा भाजपची साथ सोडणार?

On: December 26, 2025 11:39 AM
Ajit Pawar
---Advertisement---

Ajit Pawar | महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. महायुतीचा घटक असतानाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनेक महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. “भाजपच्या कुबड्या नकोत” असा स्पष्ट संदेश देत अजित पवारांनी स्वबळाचा नारा दिल्याने महायुतीतच पहिला मिठाचा खडा पडल्याचे बोलले जात आहे. (Mahayuti Trouble)

भाजप आणि शिंदे गटाशी जागावाटपावरून सूर न जुळल्याने अजित पवार गटाने ‘एकला चलो रे’चा मार्ग स्वीकारल्याची माहिती मिळत आहे. नैसर्गिक युतीचा भाग नसल्याने अनेक ठिकाणी राष्ट्रवादीला अपेक्षित सन्मानजनक जागा मिळत नसल्याची भावना पक्षात आहे. यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी महायुती विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी असा थेट सामना पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अनेक महापालिकांमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी :

मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, मिरा-भाईंदर, अमरावती, पुणे-पिंपरी चिंचवड, नाशिक आणि सोलापूर या प्रमुख महापालिकांमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. शिवसेना-भाजप एकत्र लढत असतानाही एनसीपीला जागावाटपात अपेक्षित स्थान मिळत नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अनेक शहरांमध्ये महायुतीत असूनही अंतर्गत लढत रंगण्याची चिन्हे स्पष्ट होत आहेत. ( Municipal Corporation Election)

नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये अजित पवार गटाने उल्लेखनीय कामगिरी करत आपली ताकद दाखवून दिली आहे. मराठवाड्यात शिंदे सेनेचा प्रभाव असतानाही राष्ट्रवादीने मोठी धडक दिल्याने भाजपनंतर दुसरा क्रमांकाचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी उदयास आली आहे. या यशामुळे महापालिकेतही “स्वतःच्या ताकदीवर लढा” असा सूर स्थानिक नेत्यांकडून लावण्यात येत आहे.

Ajit Pawar | अंतिम निर्णय चर्चेनंतर; नवी समीकरणे शक्य :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार (Ajit Pawar) आणि सुनील तटकरे (sunil tatkare) यांच्यात होणाऱ्या चर्चेनंतर स्वबळाचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असे समजते. मात्र, स्थानिक पातळीवर युती करताना शक्यतो काँग्रेस वगळता समविचारी पक्षांसोबत जाण्याचा सल्ला भाजपकडून देण्यात आल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे काही महापालिकांमध्ये नव्या आघाड्या तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, पनवेल महापालिका निवडणूक मात्र महाविकास आघाडी एकत्र लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीतील जागावाटपाचा तिढाही सुटला असून भाजपविरोधात सर्व मित्रपक्ष एकत्र येणार आहेत. एकूणच अजित पवारांच्या स्वबळाच्या भूमिकेमुळे आगामी महापालिका निवडणुका अधिक चुरशीच्या ठरण्याची शक्यता असून महायुतीची डोकेदुखी निश्चितच वाढणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

News Title : Ajit Pawar’s ‘Go Solo’ Call Before Civic Polls, Trouble Brewing Within Mahayuti

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now