…तर त्यावेळी माझी चूक झाली; अजित पवार नेमकं काय म्हणाले?

On: November 25, 2024 1:12 PM
NCP Star Campaigners
---Advertisement---

Ajit Pawar l आज राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा स्मृतिदिन असल्याने अजित पवार यांनी कराडमधील ‘प्रीतीसंगम’ या यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन त्यांच्या स्मृतींना अभिवादन केलं आहे. यावेळी अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य देखील केलं आहे. तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी तुमचं नाव चर्चेत आहे का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. तेव्हा ते महायुतीचे तिन्ही पक्षाचे नेते बसून यावर निर्णय घेऊ असं अजित पवार म्हणाले आहेत.

अजित पवार नेमकं काय म्हणाले? :

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने माझी नेता म्हणून निवड झालेली आहे. त्यामुळे सर्व अधिकार मला दिले. तसेच एकनाथ शिंदे यांची देखील काल नेता म्हणून निवड केली आहे.

याशिवाय आता भाजप पक्षाने नेते म्हणून निवड कुणाची करायची की नाही ते ठरवलं असेलच. त्यामुळे आता आम्ही तिघंही नंतर एकत्र बसू. तसेच आमच्या सहकाऱ्यांशी देखील चर्चा करू. त्यानंतर राज्याला मजबूत आणि स्थिर सरकार देऊ असं अजित पवार म्हणाले आहेत.

Ajit Pawar l चूक झाली म्हणजे घरातलाच माणूस उभा करायचा काय? :

बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे सख्ख पुतणे युगेंद्र पवार हे निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. यासंदर्भात देखील अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. युगेंद्र हा धंदापाणी करणारा माणूस आहे. त्याचा राजकारणाशी काहीही एक संबंध नाही.

तसेच माझ्या सख्ख्या भावाच्या मुलालाच माझ्या विरोधात उमेदवारी दिली. तर माझ्या विरोधात माझ्या सख्ख्या पुतण्याला उभं करायचं काहीच कारण नव्हतं. मी तर त्यांना सांगून दमलो की, लोकसभेला माझी चूक झाली, चूक झाली, चूक झाली… पण माझी चूक झाली म्हणजे घरातलाच माणूस उभा करायचा काय? असं देखील अजित पवार म्हणाले आहेत.

News Title – Ajit Pawar on Yugendra Pawar

महत्त्वाच्या बातम्या-

मी कटाचा बळी ठरलो; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप

पराभव जिव्हारी लागला; काँग्रेसचा बडा नेता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

राज्यातील ‘या’ 20 जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार?

भाजपला मिळणार सर्वाधिक मंत्रीपदं?, महायुतीचा संभाव्य मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला समोर

पराभवानंतर राज ठाकरेंना आणखी एक धक्का, मनसेचं ‘इंजिन’ धोक्यात?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now