अजितदादांना मोठा धक्का, बडा नेता शरद पवारांच्या गळाला

On: September 19, 2024 11:38 AM
Ajit Pawar
---Advertisement---

Ajit Pawar l आगामी विधानसभा निवडणुक काही दिवसांवर आली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. अशातच आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला एक मोठा धक्का बसला आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ओबीसी सेलचे प्रदेश समन्वयक आणि प्रदेश सरचिटणीस ईश्वर बाळबुद्धे यांनी त्यांच्या पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांकडे परतण्याचा निर्णय घेतला आहे.

अजित पवार गटाला मोठा धक्का :

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ईश्वर बाळबुद्धे यांची घरवापसी होणार आहे. ईश्वर बाळबुद्धे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेल्या काही दिवसांपूर्वीच राम-राम ठोकला आहे. अशातच आता ईश्वर बाळबुद्धे उद्या पुन्हा एकदा स्वगृही परतणार आहेत. यावेळी ईश्वर बाळबुद्धे यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होणार आहे.

याशिवाय या पक्ष प्रवेशाच्या वेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माजी मंत्री अनिल देशमुख हे देखील उपस्थित राहणार आहेत. उद्या सकाळी म्हणजेच 20 सप्टेंबरला 11 वाजता हा प्रवेश पार पडणार आहे. ईश्वर बाळबुद्धे यांनी अनेक वर्ष ओबीसी चळवळीत काम देखील केले आहे. मात्र अशातच आता त्यांच्या या निर्णयामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला धक्का बसला आहे.

Ajit Pawar l ईश्वर बाळबुद्धे यांची घरवापसी :

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडलेली असताना देखील ईश्वर बाळबुद्धे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष होते. ईश्वर बाळबुद्धे यांनी राज्यभरात यात्रा देखील काढली होती. मागील विधानसभा निवडणुकीत ओबीसी आमदारांचा राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचा प्रचंड मोठा वाटा होता. ईश्वर बाळबुद्धे यांनी प्रत्येक मतदारसंघात जाऊन प्रचार देखील केला होता.

याशिवाय ओबीसी सेलच्या कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबिर नागपूर येथे त्यांच्या नेतृत्वात घेण्यात आलं होतं. तसेच महाविकास आघाडीचे सरकार असताना ओबीसी महामंडळाच्या अध्यक्षपदी बाळबुद्धे यांची नियुक्ती देखील करण्यात आलेली होती. मात्र नियुक्तीचा आदेश सरकार अस्तित्वात असेपर्यंत निघालेला नव्हता. नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय फुट पडली. तेव्हा ईश्वर बाळबुधे यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर आता वर्षभराच्या आत त्यांनी पुन्हा घरवापसी केली आहे.

News Title : Ajit pawar group leader ishwar balbudhe will join sharad pawar

महत्वाच्या बातम्या –

बँकेची काम आजच उरकून घ्या, सलग 4 दिवस बँका बंद राहणार

जोरदार उसळीनंतर सोनं पुन्हा झालं स्वस्त; सध्या काय आहेत किंमती?

ऑक्टोबर महिन्यात शनी नक्षत्र बदलणार, ‘या’ 3 राशींचं नशीब चमकणार

आनंदवार्ता! पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, जाणून घ्या 1 लिटरचे लेटेस्ट दर

तिरुपतीच्या प्रसादामध्ये तुपाऐवजी जनावरांची चरबी?, चंद्राबाबूंचा धक्कादायक आरोप

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now