“भारतात लग्नापूर्वी शारीरिक संबंध…”; ऐश्वर्या रायच्या वक्तव्याने खळबळ

On: March 25, 2025 9:11 PM
Aishwarya Rai on Premarital Intimacy 
---Advertisement---

Aishwarya Rai | विश्वसुंदरी तथा बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai ) हिने लग्नापूर्वी शारीरिक संबंधांबाबत दिलेलं उत्तर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. तिचं मत समाजातील पारंपरिक विचारसरणी आणि आधुनिक दृष्टिकोन यामध्ये संतुलन साधणारे असल्याचं पाहायला मिळतं.

काय म्हणाली ऐश्वर्या राय?

एका मुलाखतीत ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) हिला विचारण्यात आलं होतं की, लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणं योग्य आहे की अयोग्य? यावर उत्तर देताना तिने भारतीय संस्कृतीचा सन्मान राखणारी भूमिका घेतली. ती म्हणाली होती की, भारतात पारंपरिक दृष्टिकोनातून पाहिलं तर लग्नापूर्वीचे शारीरिक संबंध हे निषिद्ध मानले जातात. त्यामुळेच अनेक लोक या विषयावर खुलेपणाने बोलायला संकोच करतात.

पण याचबरोबर ऐश्वर्या हिने हे देखील स्पष्ट केलं की, या विषयावरचा दृष्टिकोन प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक श्रद्धा, संस्कार आणि जीवनदृष्टीवर अवलंबून असतो. कोणताही निर्णय घेताना घाई न करता परस्पर सन्मान, समजूतदारपणा आणि जबाबदारी याचा विचार करणं गरजेचं आहे.

संबंधांबाबत खुलं पण जबाबदार दृष्टिकोन बाळगा – ऐश्वर्याचं आवाहन

ऐश्वर्या रायच्या (Aishwarya Rai ) म्हणण्यानुसार, शारीरिक जवळीक हा प्रत्येक नात्यातील एक अतिशय वैयक्तिक आणि संवेदनशील भाग असतो. त्यामुळे हे योग्य की अयोग्य, हे ठरवताना प्रत्येक जोडप्याने आपापल्या मूल्यांना आणि एकमेकांमधील विश्वासाला महत्त्व दिलं पाहिजे.

ती म्हणाली होती की, “संबंध ठेवायचा निर्णय पूर्णतः तुमच्या वैयक्तिक विचारांवर, संस्कृतीवर आणि नात्यातील परिपक्वतेवर आधारित असावा. मात्र, कोणताही निर्णय हे केवळ क्षणिक भावना नव्हे, तर दीर्घकालीन परिणाम असलेला असतो हे लक्षात ठेवा.”

समाजातील बदलत्या ट्रेंड्समध्ये जरी रिलेशनशिप्स सामान्य झाली असली, तरी शारीरिक संबंधांसंबंधी निर्णय घेताना वैयक्तिक जबाबदारी, मानसिक तयारी आणि परस्पर आदर यांचा विचार करणं महत्त्वाचं आहे, असं ती म्हणाली.

Title : Aishwarya Rai on Premarital Intimacy 

 

Join WhatsApp Group

Join Now