लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवरील ऐश्वर्या रायचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली…

On: February 4, 2025 4:43 PM
Aishwarya Rai
---Advertisement---

Aishwarya Rai | गेल्या काही काळापासून बॉलिवूडमध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या अफवा उठत होत्या. ऐश्वर्याने (Aishwarya Rai) आपल्या नावातून ‘बच्चन’ आडनाव काढून टाकल्यानंतर या अफवांना आणखीनच जोर चढला होता. इतकेच नाही तर, अभिषेक बच्चनसोबत अभिनेत्री निम्रत कौरचे नावही जोडले जाऊ लागले होते.

ऐश्वर्या आता आपली मुलगी आराध्यासोबत बच्चन कुटुंबापासून वेगळी राहत असल्याची माहितीही समोर आली होती. परंतु, याबद्दल या दोघांनीही कधीच उघडपणे काहीही भाष्य केले नव्हते. अखेर, या सर्व अफवांना पूर्णविराम देत या दोघांनी एकत्र येत या अफवा खोट्या असल्याचे सिद्ध केले.

काय म्हणाली होती ऐश्वर्या राय?

एकत्र फोटो काढत अभिषेक आणि ऐश्वर्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. इतकेच नव्हे तर, त्यांची मुलगी आराध्याच्या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात देखील या दोघांना एकत्र पाहिले गेले होते.

आता ऐश्वर्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एका मुलाखतीत तिने पाश्चिमात्य संस्कृतीबद्दल काही मते मांडली होती. तोच व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये, भारतातील प्रेमी युगुलांनी सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेण्यावर ऐश्वर्या म्हणाली, “भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने हे थोडे विचित्र वाटते. परंतु, चित्रपटांमध्ये ते कधीकधी स्वीकारले जाते.” यानंतर लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर ऐश्वर्या म्हणाली, “पाश्चिमात्य संस्कृतीत हा थोडा वादग्रस्त मुद्दा आहे.”

विशेष म्हणजे, त्यावेळी ऐश्वर्याने (Aishwarya Rai) अभिषेकसोबत लग्न केलेले नव्हते. अभिनेत्रीचा २००५ मधील हा मुलाखतीचा व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

Title : Aishwarya Rai old interview on western culture goes viral

 

Join WhatsApp Group

Join Now