चाहते चिंतेत, ऐश्वर्या रायच्या गाडीला बसची जोरदार धडक; व्हिडिओ व्हायरल

On: March 27, 2025 7:49 AM
Aishwarya Rai Car Hit by Bus Video Viral
---Advertisement---

Aishwarya Rai | बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) हीच्या गाडीला मुंबईतील जुहू परिसरात अपघात झाला असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सुदैवाने, या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसून गाडीचेही फारसे नुकसान झालेले नाही.

जुहू परिसरात बसने दिली ऐश्वर्याच्या गाडीला धडक

बुधवारी दुपारी ऐश्वर्या राय बच्चनच्या सिल्वर वेलफायर गाडीला बेस्ट (BEST) बसने जुहू येथील तिच्या निवासस्थानाजवळ धडक दिली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ सध्या इंस्टाग्रामसह विविध सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बसने दिलेल्या धडकेमुळे गाडी थोडीशी हलली, मात्र मोठ्या नुकसानाची नोंद नाही. अपघाताच्या वेळी गाडीत नेमकं कोण होतं, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

ऐश्वर्याच्या टीमकडून अद्याप याबाबत कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नसला, तरी घटनास्थळावरून गाडी लगेच पुढे गेल्याने परिस्थिती गंभीर नसल्याचे दिसते. व्हिडिओतील दृश्यांनुसार, बसचालकाने गाडीला थोडीशी धडक दिल्यानंतर कोणतीही गोंधळाची स्थिती निर्माण झाली नव्हती.

व्हायरल व्हिडिओवर युजर्सच्या भन्नाट प्रतिक्रिया

घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांना उधाण आलं आहे. अनेकांनी गमतीदार अंदाजात प्रतिक्रिया देताना, “बसमधले सगळे बरे आहेत ना?” असा प्रश्न विचारला. तर काहींनी जया बच्चन यांचा संदर्भ देत लिहिलं, “जर ही गाडी जयांची असती, तर बसचालकाची खैर नव्हती!”

या व्हिडिओमुळे ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai ) पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. ती अलीकडेच दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा मुलगा कोणार्क याच्या विवाह सोहळ्यात सहभागी झाली होती. नियती आणि कोणार्क यांच्या लग्नासाठी बच्चन कुटुंब एकत्र जमले होते. त्या सोहळ्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

सोनू सूदच्या पत्नीचाही अलीकडेच अपघात

दरम्यान, अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याची पत्नी सोनाली सूद हिचा नुकताच अपघात झाला होता. ती या अपघातात गंभीर जखमी झाली होती. सध्या तिची प्रकृती स्थिर असून, सोनू सूदने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली होती.

 Title : Aishwarya Rai Car Hit by Bus Video Viral

 

Join WhatsApp Group

Join Now