घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना अभिषेकने ऐश्वर्यासोबत केलं असं काही, व्हिडीओ होतोय व्हायरल!

On: April 12, 2025 7:31 PM
aishwarya rai
---Advertisement---

Aishwarya Rai | ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या वैयक्तिक आयुष्यावर कायमच माध्यमांचे लक्ष असते. दोघे अनेकदा एकत्र दिसले तरी त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चा थांबत नाहीत. अलीकडे व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत ऐश्वर्याने अभिषेकबद्दल भावनिक वक्तव्य केलं असतानाही, अभिषेकचा थंड प्रतिसाद सर्वांच्या नजरा वेधून घेतो आहे.

‘लव्ह ऑफ माय लाईफ’ –

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai) एका कार्यक्रमात तिच्या पहिल्या वर्ल्ड टूरचा अनुभव शेअर करत होती. “हे माझं पहिलं टूर आहे माझ्या आयुष्याच्या प्रेमासोबत, माझ्या नवऱ्यासोबत. हे त्याचं पहिलं जागतिक दौऱं आहे आणि हे कायम खास राहील कारण आम्ही हे एकत्र केलं,” असं ती म्हणाली. तसेच तिने सांगितले की, तिचे सासरे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि सासूबाई देखील तिच्यासोबत होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aish❤️ (@aishwaryamylight)

या दरम्यान, अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) तिच्या शेजारी उभा असतानाही तो भावनाशून्य चेहऱ्याने ऐकत असल्याचं स्पष्ट दिसतं. ऐश्वर्याच्या या प्रेमळ शब्दांनाही तो कोणतीही प्रतिक्रिया देताना दिसत नाही, ज्यामुळे प्रेक्षकांनी सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप-

व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी अभिषेकवर टीका केली. एका युजरने लिहिलं, “ऐश्वर्या इतकं प्रेमाने बोलतेय, तरी अभिषेकचं चेहरा बघा! जणू काही तो कुठल्या अलेक्झांडरचा अवतार आहे!” दुसऱ्याने लिहिलं, “कमीत कमी हस तरी! किती गोड बोलतेय ती.” आणखी एका युजरने मिश्कील टिप्पणी केली – “कोणी तरी त्याला ‘स्टॅच्यू’ म्हटलंय बहुतेक, म्हणून तो थंड झाला आहे.”

दरम्यान, अलीकडेच ऐश्वर्या (Aishwarya Rai) आणि अभिषेक त्यांच्या मुलगी आराध्या (Aaradhya Bachchan)सोबत पुण्यात तिच्या चुलत भावाच्या लग्नात सहभागी झाले होते. त्या लग्नातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एका फोटोमध्ये दोघं ऐश्वर्याच्या कुटुंबासोबत पोझ देताना दिसले, तर दुसऱ्या फोटोमध्ये ऐश्वर्या एका लाल-गोल्डन अनारकलीमध्ये अत्यंत आकर्षक दिसत होती.

News Title – Aishwarya rai Calls Abhishek ‘Love of My Life’

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now