ऐश्वर्याच्या एक्स बॉयफ्रेंडचा अभिषेक बच्चनबाबत मोठा खुलासा!

On: May 23, 2024 2:06 PM
Aishwarya-Abhishek Grey Divorce Marathi News Update 
---Advertisement---

Aishwarya Rai | बॉलिवूडची अभिनेत्री ऐश्वर्याने 2007 मध्ये अभिनेता अभिषेक बच्चनसोबत विवाह केला. मात्र आजही ऐश्वर्या (Aishwarya Rai) ही कोट्यवधींच्या काळजाचा ठोका वाजवणारी अभिनेत्री आहे. ऐश्वर्याचं विवाहाआधी अनेकजणांसोबत नाव जोडलं गेलं होतं. आधी अभिनेता सलमान खान, त्यानंतर अभिनेता विवेक ओबेरॉय याचं अभिनेत्रीसोबत नाव जोडण्यात आलं. मात्र विवेक ओबेरॉय हा दोन वर्षच अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. त्यानंतर त्यांचं रिलेशनशिप फार वर्षे टिकलं नाही. नुकतंच विवेक ओबेरॉयने एका मुलाखतीत बोलत असताना झालेल्या अपघाताबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. (Aishwarya Rai)

अभिषेक बच्चनने वाचवले होते विवेक ओबेराॅयचे प्राण

ऐश्वर्या रायचा (Aishwarya Rai) एक्स बॉयफ्रेंड विवेक ओबेरॉयने त्याच्या अपघाताबाबत एका मुलाखतीत बोलत असतानाचा किस्सा सांगितला आहे. त्यावेळी अभिनेत्याच्या मदतीला अभिषेक बच्चन धावून आला. जुने दिवस आठवत विवेकने एक किस्सा सांगितला आहे.

युवा सिनेमाचं शुटिंग सुरू होतं. तेव्हा विवेकचा अपघात झाला होता. त्याच्या पायाला तीन ठिकाणी जखम झाली होती. तेव्हा अभिषेक बच्चन आणि अजय देवगन मदतीला आले होते. ते मला रूग्णालयात घेऊन गेले होते. मी पूर्णपणे रक्तबंबाळ होतो. नंतर मला कळालं की माझा अपघात पाहिल्यानंतर दिग्दर्शक मणिअन्ना यांना हार्ट अटॅक आला… दोघांवर एकाच रुग्णालयात उपचार सुरु होते.’ (Aishwarya Rai)

“पेनकिलर आणि दोघांच्या विनोदामुळे मला हिंमत मिळाली”

अजय आणि अभिषेक माझ्यासोबतच होते. मला काहीही कळत नव्हतं. पेनकिलर आणि दोघांच्या विनोदामुळे मला हिंमत मिळाली होती. युवा सिनेमाचं शुटिंग चालू होतं ते बंद करण्यात आलं होतं. पुन्हा नंतर सर्व काही सुरळीत झालं होतं. माझी प्रकृती स्थिर झाली. कधी कधी असं वाटलं की मी एवढं कसं काय करू शकलो, असं त्याने सांगितलं.

युवा सिनेमात अजय, अभिषेक आणि विवेक हे काम करत होते. त्यांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. सिनेमाने बॉ्क्स ऑफिसवर तगडी कमाई केली आहे. तिघांसाठी हा सिनेमा महत्त्वपूर्ण ठरला आहे. तिघांनी मागे वळून पाहिलं नाही.

विवेक आणि अभिनेत्रीचं रिलेशलशिप अधिककाळ टिकू शकलं नाही. त्यानंतर अभिषेक बच्चनने ऐश्वर्याशी लग्न करून आपला संसार थाटला आहे. सध्या ऐश्वर्या सिनेमा क्षेत्रा काही वेळासाठी लांब आली. त्या दोघांना आराध्या नावाची मुलगी आहे.

News Title – Aishwarya Rai Bachchan Husband Abhishek Bachchan Save Vivek Oberoi Life At The Shoot time

महत्त्वाच्या बातम्या

‘माझा मुलगा निष्ठांवत अन् कणखर’; पित्याकडून मुलाचं तोंडभरून कौतुक

पोलिसांना शिवीगाळ करणं भाजप नेत्याला पडलं महागात, अखेर…

‘अमोलने एकनाथ शिंदेंची ऑफर नाकारली’; गजानन किर्तीकरांचा मोठा खुलासा

गुजरातच्या जीएसटी आयुक्तांनी महाराष्ट्रातलं अख्खं गाव विकत घेतलं!

महेंद्रसिंह धोनीने घेतला सर्वांत मोठा निर्णय; पोस्ट करत म्हणाला..

Join WhatsApp Group

Join Now