अहमदनगरमधून मोठी अपडेट्स समोर; पाहा कोण आघाडीवर?

On: June 4, 2024 9:54 AM
Ahmednagar Loksabha
---Advertisement---

Ahmednagar l अहमदनगर लोकसभा निवडणुकीच्या निकालाची मतमोजणी सध्या सुरु आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर लोकसभा जागेसाठी चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान झाले होते. यंदाच्या वर्षी एकूण 62.76 टक्के मतदान झाले आहे. येथे मुख्य लढत भाजपचे उमेदवार व विद्यमान खासदार सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे निलेश ज्ञानदेव लंके यांच्यात लढत झाली आहे. अशातच आता अहमदनगर लोकसभा निवडणुकीत निलेश लंके आघाडीवर आहेत.

अहमदनगरमध्ये निलेश लंके आघाडीवर :

अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू आहे.अशातच आता निलेश लंके आघाडीवर आहेत. सुजय विखेंची स्पर्धा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नीलेश ज्ञानदेव लंके यांच्याशी आहे. सध्या निलेश ज्ञानदेव लंके आघाडीवर आहेत.

अहमदनगर लोकसभेच्या या मतदारसंघात अनेक दिग्गज नेत्यांनी प्रतिष्ठापणाला लावली होती. त्यामुळे नगर मतदारसंघ हा केंद्रस्थानी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या निकालाकडे सारणाचा लक्ष लागलं आहे.

Ahmednagar l 2019 मध्ये सुजय विखेंनी मारली होती बाजी :

2019 च्या निवडणुकीत भाजपचे सुजय विखे पाटील यांनी 7 लाख 4 हजार 660 मते मिळवून विजय मिळवला होता. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम अरुण जगताप यांचा 2 लाख 81 हजार मतांनी पराभव केला होता. 2019 च्या निवडणुकीत संग्राम अरुण यांना एकूण 4 लाख 23 हजार मते मिळाली होती.

लोकसभेची ही जागा दीर्घकाळ काँग्रेसच्या ताब्यात होती. 1952 मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीपासून 1996 पर्यंत काँग्रेस पक्ष सलग 12 वेळा येथून विजयी होत राहिला. मात्र, नंतरच्या काळात काँग्रेसची पकड कमकुवत झाली आणि आता या जागेवर भाजपची सत्ता आहे.

News Title- Ahmednagar Loksabha Election Result

महत्वाच्या बातम्या-

बीडमध्ये तब्ब्ल ‘इतक्या’ फरकाने बजरंग सोनावणे आघाडीवर

मोठी गुड न्यूज! निकालापूर्वीच सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजच्या किंमती 

आज शंभर टक्के या राशी गुलाल उधळणार; पाहा कोणाचं नशीब उजळणार

मोठी बातमी! भाजपनं स्वबळावर केला 200 चा आकडा पार

शिरूरमध्ये अजितदादांना धक्का; अमोल कोल्हे यांनी आढळरावांना टाकलं मागे

 

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now