‘गौरीच्या रूपाने मला…’; दोन घटस्फोटांनंतर आमिर खानचं गर्लफ्रेंडबाबत मोठं वक्तव्य

On: June 2, 2025 2:05 PM
Aamir Khan Relationship
---Advertisement---

Aamir Khan Relationship | ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेते आमिर खान आगामी ‘सितारे जमीन पर’  (Sitare Jamin Par) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. २० जून रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. ‘लाल सिंग चड्डा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी न झाल्यानंतर आमिर खान कोणत्याही सिनेमात दिसले नव्हते. आता ते थेट या सिनेमातून कमबॅक करत आहेत. सिनेमासोबतच, आमिर खान सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहेत. (Aamir Khan Relationship)

आमिर खान सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत :

आमिर खान वयाच्या ६० व्या वर्षी ते पुन्हा प्रेमात पडले असून, ४६ वर्षीय गौरी स्प्रॅटला ते डेट करत असल्याची चर्चा आहे. दोन घटस्फोटांनंतर ते आता गौरीसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. नुकतीच त्यांनी मुलाखतीत गौरीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

मुलाखतीत आमिर खानने (Aamir Khan Relationship) अनेक विषयांवर मोकळेपणाने भाष्य केले. यावेळी गौरीबद्दल बोलताना ते म्हणाले, “गौरीला भेटण्यापूर्वी मला वाटायचे की मी आता म्हातारा झालो आहे. या वयात आता मला कोण भेटणार?” मात्र, थेरपीमुळे आपण हे शिकलो की आधी स्वतःवर प्रेम करणे गरजेचे आहे. त्यांना बरे व्हायचे होते आणि स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यायचे होते. त्यांच्या मते, रीना दत्त आणि किरण राव यांच्यासोबत त्यांचे आजही चांगले संबंध आहेत आणि ते आजही चांगले मित्र आहेत. त्यांच्या मनात एकमेकांबद्दल आदर आहे. त्यांना असे वाटायचे की आता त्यांना अशी कोणीही व्यक्ती भेटणार नाही, जिच्यासोबत इतके छान ‘बॉन्ड’ निर्माण होतील.

Aamir Khan Relationship | गौरीच्या रूपाने मला एक सरप्राईज मिळाले :

ते पुढे म्हणाले, “मी आणि गौरी चुकून एकमेकांना भेटलो. आमच्यात मैत्री झाली आणि नकळतपणे आम्ही प्रेमात पडलो. एकमेकांबद्दल आदर वाढत गेला. हे सर्व आपोआप घडले, मी काहीही प्लॅन केले नव्हते. खरे तर, मी असा विचार केला होता की, माझ्याजवळ आई आहे, भावंडं आहेत, माझी मुले आहेत. त्यामुळे आता मला पार्टनरची गरज नाही. कारण माझी बाकी नातीच इतकी घट्ट होती.” त्यांनी सांगितले की, किरण आणि रीना यांच्यासोबत ते आजही ‘पानी फाऊंडेशन’साठी काम करतात. “आम्ही सगळे नेहमीच एक कुटुंब राहिलो आहोत. दोघीही माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे आता माझ्या आयुष्यात कोणीही येणार नाही असेच मला वाटायचे. पण गौरीच्या रूपाने मला एक ‘सरप्राईज’च मिळाले,” असे आमिर खान यांनी नमूद केले. (Aamir Khan Relationship)

या खुलाशातून आमिर खान यांच्या वैयक्तिक आयुष्यातील नवीन टप्पा आणि त्यांच्या नात्यांमधील परिपक्वता दिसून येते. ‘सितारे जमीन पर’ या सिनेमातून ते पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्यांच्या या नव्या नात्याबद्दलही चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

News Title: “After Two Divorces, I Need a Partner…”: Aamir Khan Speaks About Girlfriend Gauri

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now