पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने होणार का? BCCIने दिली माहिती

On: April 24, 2025 3:34 PM
WCL 2025
---Advertisement---

India vs Pakistan l काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam attack) येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर भारताने पाकिस्तानविरोधात (pakistan) एकामागून एक कडक निर्णय घेतले असून, आता याचे पडसाद क्रिकेट विश्वातही उमटायला सुरुवात झाली आहे.

BCCI (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) कडून यासंदर्भात महत्त्वाचं वक्तव्य करण्यात आलं आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (rajiv shukla) यांनी पहलगाम हल्ल्यावर तीव्र दु:ख व्यक्त करताना भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) क्रिकेट सामन्यांबाबत सरकारच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे.

सरकारचं धोरण स्पष्ट :

राजीव शुक्ला म्हणाले, “भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय क्रिकेट मालिकांसंदर्भात निर्णय हा पूर्णतः केंद्र सरकारच्या धोरणावर आधारित असतो. सध्या सरकार पाकिस्तानसोबत कोणताही द्विपक्षीय संपर्क ठेवण्याच्या मूडमध्ये नाही आणि त्यामुळे आम्हीदेखील त्या निर्णयाचे पालन करत आहोत.”

त्यांनी स्पष्ट केलं की, “फक्त आयसीसीच्या स्पर्धांमध्ये अनिवार्य सहभागामुळे आम्ही पाकिस्तानसोबत खेळतो, त्यापलीकडे कोणतीही मालिका सध्या शक्य नाही.”

India vs Pakistan l 2012-13 नंतर द्विपक्षीय क्रिकेट संबंध ठप्प :

भारत आणि पाकिस्तानमधील (India vs Pakistan) शेवटची द्विपक्षीय मर्यादित षटकांची मालिका 2012-13 मध्ये खेळली गेली होती. त्यानंतर दोन्ही देशांदरम्यान फक्त आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येच सामने खेळवले जात आहेत, जसं की 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकातील सामना.

भारत सरकारचा आक्रमक पवित्रा आणि क्रिकेटवर परिणाम :

पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सीसीएस (कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी) ची आपत्कालीन बैठक झाली. या बैठकीत सिंधू पाणी करार थांबवणे, पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा बंद करणे यांसारखे अनेक निर्णय घेण्यात आले. त्यामुळे, क्रीडा आणि संस्कृती यामधील पाकिस्तानी सहभागावर आता अजून कठोर भूमिका घेतली जात आहे.

News Title: After Pahalgam Attack, No Bilateral Cricket Series with Pakistan: BCCI Vice President Confirms

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now