दुष्काळाच्या खाईत पाकिस्तान?, सिंधू करारनंतर भारताचा आणखी एक मोठा निर्णय!

On: April 29, 2025 8:00 AM
Pahalgam Attack Wular Lake
---Advertisement---

Pahalgam Attack | पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. सिंधू करार रद्द करून आणि वुलर तलावावर (Wular Lake) धरण बांधण्याचा निर्णय घेऊन पाकिस्तानच्या पाण्याच्या स्रोतावर थेट आघात करण्याची तयारी सुरू झाली आहे. यामुळे पाकिस्तानला दुष्काळ आणि पुराचा दुहेरी धोका संभवतो.

वुलर तलावावर धरण बांधणार 

पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध आक्रमक पावले उचलली आहेत. सर्वात मोठा निर्णय म्हणजे सिंधू पाणी कराराचे निलंबन, ज्यामुळे पाकिस्तानला भारतातून मिळणारे पाणी थांबणार आहे. वुलर तलावावर धरण बांधण्याचा निर्णयही त्याचाच एक भाग आहे. बांदीपोरा येथे असलेले वुलर सरोवर (Wular Lake) दक्षिण आशियातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे तलाव असून, झेलम नदीचे पाणी याच तलावातून पाकिस्तानमध्ये जाते.

जर वुलर तलावावर बॅरेज उभारण्यात आले तर पाकिस्तानकडे जाणारे पाणी थांबवता येईल. उन्हाळ्यात पाणी थांबवून दुष्काळाची स्थिती निर्माण करता येईल आणि पावसाळ्यात धरणाचे दरवाजे उघडून अचानक मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यास पाकिस्तानमध्ये महापूर येण्याचा धोका निर्माण होईल. त्यामुळे भारताने वुलर तलावाच्या नियंत्रणाद्वारे पाकिस्तानला मोठा धक्का देण्याची रणनीती आखली आहे.

वुलर बॅरेजचे काम पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा

वुलर सरोवर (Wular Lake) सोपोर ते बांदीपोरा दरम्यान 199 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले आहे. या तलावातील पाणी बारामुल्ला मार्गे पाकिस्तानात पोहोचते. 1980 पासून या तलावावर बॅरेज उभारण्याचा प्रयत्न सुरु आहे. काही भाग बांधण्यात आला होता, पण पाकिस्तानने सातत्याने आक्षेप घेतल्याने आणि दहशतवादी कारवायांमुळे काम थांबत राहिले.

1990 मध्ये प्रयत्न अपूर्ण राहिले, 2004 मध्ये सुरू झालेले कामही अपयशी ठरले, आणि 2012 मध्ये तर दहशतवाद्यांनी आयईडीने (IED) बॅरेज उडवून दिले. मात्र, आता सिंधू करार रद्द झाल्याने भारताने ठाम भूमिका घेतली आहे. भारताने स्पष्ट केले आहे की, वुलर बॅरेजचे काम पूर्ण करणार आणि एक थेंबही पाणी पाकिस्तानात जाऊ देणार नाही. त्यामुळे आता पाकिस्तानसमोर दुष्काळ आणि पूर या दोन्ही संकटांचा मोठा धोका उभा राहिला आहे.

Title : After Pahalgam Attack, India to Build Dam on Wular Lake

 

Join WhatsApp Group

Join Now