एअर स्ट्राईकनंतर भारताचा पाकिस्तानला दुसरा मोठा झटका, पाकिस्तानची पुन्हा नामुष्की!

On: May 7, 2025 6:13 PM
Operation Sindoor Major Blow to Pakistan  
---Advertisement---

Operation Sindoor | पहलगाम (Pahalgam) दहशतवादी हल्ल्याचा सूड घेतल्यानंतर भारताने पाकिस्तानवर आता दुसरा मोठा प्रहार केला आहे. एअर स्ट्राईकनंतर आता भारताने पाकिस्तानच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांनाही लक्ष्य केल्याचा दावा करण्यात आला आहे. या कारवाईने पाकिस्तानला चांगलाच धक्का बसला आहे. (Operation Sindoor)

एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानला प्रचंड नुकसान

जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने मध्यरात्री एअर स्ट्राईक करत पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर कारवाई केली. पाकिस्तानमधील 4 आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 5 असे एकूण 9 दहशतवादी केंद्र उद्ध्वस्त करण्यात आले. या कारवाईत सुमारे 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती आहे.

हल्ल्यानंतर पाकिस्तानने केलेल्या दाव्यानुसार, भारतीय लष्कराने केवळ दहशतवादी केंद्रेच नव्हे, तर त्यांच्या नीलम (Neelum) आणि नौसेरी (Nauseri) या दोन महत्त्वाच्या धरणांवर देखील बॉम्ब टाकल्याचा आरोप केला आहे. या धरणांवर पाकिस्तानचा महत्त्वाचा वीज प्रकल्प कार्यरत असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा दावा पाकिस्तानी लष्कर आणि माध्यमांकडून करण्यात येत आहे. विशेषतः नौसेरी धरणाच्या परिसरात वीज निर्मिती केंद्र असल्याने याचा परिणाम संपूर्ण भागावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पाकिस्तानकडून वेगळेच दावे 

पाकिस्तानने या कारवाईनंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतावर आक्षेप घेत दावा केला आहे की, भारताच्या हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन झाले आहे. मात्र त्याच वेळी ज्या ठिकाणी हल्ले झाले, तिथे दहशतवादी नव्हते असे सांगणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आला आहे. कारण, हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला स्वतः पाकिस्तानी लष्कराचे (Pakistani Army) अधिकारी उपस्थित होते.

पाकिस्तानचा या साऱ्या घटनेवरचा दुटप्पीपणा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. एकीकडे ते दहशतवाद्यांशी संबंध नसल्याचे सांगत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्या अंत्यविधीत लष्करी उपस्थिती हे त्याच्या समर्थनाला विरोधाभासी सिद्ध करत आहे. याचे काही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Title : after Operation Sindoor Major Blow to Pakistan  

 

Join WhatsApp Group

Join Now