‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानने ‘हे’ १५ जिल्हे केले टार्गेट, दहशतवादी हल्ल्याचा धोका!

On: May 8, 2025 12:58 PM
Cyberattack
---Advertisement---

India Pakistan Tension | भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील (India Pakistan Tension) ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानने चवताळलेली प्रतिक्रिया दिली आहे. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार सुरू असून, यामध्ये भारतातील १२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच ४० हून अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेत एक भारतीय जवान शहीद झाला आहे. परिणामी सीमाभागात अर्लट जारी करण्यात आला आहे. (India Pakistan Tension)

जम्मू-कश्मीरसह पंजाबमधील सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये विशेष सतर्कता बाळगण्यात येत आहे. प्रशासनाने रुग्णालये, शाळा, मोबाईल नेटवर्क आणि प्रशासकीय सेवा २४ तास कार्यरत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सामान्य नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, अफवांपासून सावध राहण्याचे सांगण्यात आले आहे.

हे आहेत पाकिस्तानच्या निशाण्यावर असलेले १५ जिल्हे :

गोळीबाराचे सर्वाधिक प्रमाण जम्मूच्या पूंछ जिल्ह्यात असून, १९७१ नंतर प्रथमच येथे तोफगोळ्यांचा मारा सार्वजनिक ठिकाणी झाल्याचे दिसून आले. उरी आणि तंगधार सेक्टरमध्येही तोफगोळ्यांचे आवाज ऐकू येत आहेत. या भागातील नागरिक दहशतीच्या सावटाखाली आहेत.

India Pakistan Tension | जम्मू-कश्मीरमधील धोक्यात असलेले १० जिल्हे:

बांदीपोरा
बारामुल्ला
बडगाम
जम्मू
कठुआ
कुपवाडा
शेपूट
राजौरी
सांबा
पूंछ

पंजाबमधील धोक्यात असलेले ५ जिल्हे:

अमृतसर
फाजिल्का
फिरोजपूर
गुरुदासपूर
पठाणकोट

गुजरातमधील प्रकल्पांवरही हायअलर्ट :

फक्त जम्मू-कश्मीर (Jammu Kashmir) आणि पंजाबच (Punjab) नव्हे तर गुजरातमधील (Gujrat) महत्त्वाच्या प्रकल्पांवरही हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. जामनगर (Jamnagar) येथील रिलायन्स रिफायनरी प्रकल्प आणि खावडामधील सोलार एनर्जी पार्कची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. याशिवाय, इतर संवेदनशील स्थळांवरही सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

भारत-पाकिस्तानमधील (India Pakistan Tension) वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारीचे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे. केंद्र सरकारकडून सतत परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून, लष्करी पातळीवरही तयारी वाढवण्यात आली आहे.

News Title: After Operation Sindoor, 15 Indian Districts on Pakistan’s Target List – Full List Revealed

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now