मंत्री योगेश कदम राजीनामा देणार? गुंड निलेश घायवळ शस्त्र परवाना प्रकरण भोवणार

On: October 9, 2025 5:39 PM
Yogesh Kadam Controversy
---Advertisement---

Yogesh Kadam Controversy | कोथरुडमधील (Kothrud) गोळीबारप्रकरणी मकोका कारवाईनंतर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेला कुख्यात गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghayawal) सध्या परदेशात लपल्याचे समजते. मात्र आता त्याचा भाऊ सचिन घायवळला (Sachin ghaiwal) शस्त्र परवाना मिळाल्याने नवा वाद पेटला आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना दिल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

पोलिसांच्या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते की सचिन घायवळवर (Sachin ghaiwal) गंभीर गुन्हे, खुनाचा प्रयत्न आणि मकोका सारख्या कलमाखाली गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारचा शस्त्र परवाना देऊ नये. मात्र, या अहवालाकडे दुर्लक्ष करून गृहराज्यमंत्री कदम यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून सचिनला परवाना मंजूर केला. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

सुषमा अंधारेंनी ट्विट करत केले आरोप :

शिवसेना (ठाकरे गट) नेत्या (Uddhav Thackeray Faction) सुषमा अंधारे (Shushma Andhare) यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक ट्वीट करत योगेश कदम यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “काल कुख्यात गुंड निलेश घायवळ चा भाऊ सचिन बन्सीलाल घायवळ शस्त्र परवाना प्रकरणांमध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, शस्त्रपरवाना देत असताना कुठलाही गुन्हा दाखल नव्हता”.

सचिन घायवळ याच्यावर फक्त खुनाचा गुन्हा नाही तर मोक्का अंतर्गत सुद्धा गुन्हे दाखल होते. विशेष अशा व्यक्तीला शस्त्र परवाना दिला जाऊ नये असा पोलिसांचा अहवाल होता. तरीसुद्धा योगेश कदम यांनी स्वतःच्या अधिकार कक्षेमध्ये हा विशेष परवाना देऊ केला.

Yogesh Kadam Controversy | गृहराज्यमंत्री पदाचा राजीनामा द्या :

योगेश कदम यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत एका गुंडाला अभय देण्याचा आणि त्याला बळ पुरवण्याचा प्रयत्न केला आहे. सबब योगेश कदम तुम्हाला पदावर राहण्याचा अधिकार नाही तात्काळ गृहराज्यमंत्री पदाचा राजीनामा द्या.

1) कोथरूड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 118 /2010 भा द वि कलम 143 147 ,148, 149 , 307, 427, 428 सह शस्त्र अधिनियम 1959 मधील कलम 3 4 25 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 एक ,135 ,142 अन्वये गुन्हा दाखल आहे.

2) दत्तवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 82 ऑब्लिक 2010 भारतीय दंड विधान कलम 120 व 302 , 307, 343, 147, 148 , 149 सह शस्त्र अधिनियम 1959 मधील कलम 3, 4, 25 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 1 सह 135 मोका कलम 3 (1)(१), 3 (1) (२) , 3(4) अन्वये गुन्हा दाखल आहे.

3) शिवाजीनगर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 3082/2025 महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.” असे ट्विट करत मंत्री योगेश कदम यांच्यावर निशाणा साधला आहे.

कदमांचा राजीनामा होणार? :

अंधारे यांनी त्यांच्या ट्वीटसोबत दोन फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये सचिन घायवळला (Sachin ghaiwal) परवाना देण्याची प्रक्रिया आणि मंजुरीचे तपशील दिसत आहेत. त्यांनी या पोस्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनाही टॅग केले आहे आणि या प्रकरणात तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.

त्यामुळे आता राज्य सरकार या वादग्रस्त परवान्याबाबत कोणती भूमिका घेते, आणि योगेश कदम यांच्यावर काही कारवाई केली जाते का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

News Title :- After granting a gun license to gangster Nilesh Ghaywal’s brother, Minister Yogesh Kadam comes under opposition fire

Join WhatsApp Group

Join Now