मुंबई-पुणे, समृद्धी महामार्गानंतर आता ‘या’ महामार्गावरही ईव्ही वाहनांसाठी टोल माफ!

On: May 24, 2025 5:28 PM
Toll Plaza
---Advertisement---

Toll Free | राज्यातील इलेक्ट्रिक वाहन धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि समृद्धी महामार्गावर टोल माफीनंतर आता शिवडी-न्हावा शेवा जोडणाऱ्या ‘अटल सेतू’वरही इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफ करण्यात आला आहे. ही टोल माफी पुढील पाच वर्षांसाठी लागू राहणार असल्याची माहिती शासन आदेशात देण्यात आली आहे.

राज्य सरकारने २९ एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत इलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन धोरणास मंजुरी दिली होती. मात्र, त्याबाबतचा अधिकृत आदेश २४ मे रोजी निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे इंधन बचत आणि पर्यावरण रक्षणाला प्रोत्साहन मिळणार आहे.

राज्य महामार्गांवरही टोलमाफीची शक्यता :

फक्त तीन प्रमुख महामार्गांपुरती ही माफी मर्यादित नसून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील इतर राज्य महामार्गांवरही लवकरच ईव्ही टोल माफी लागू करण्याचा विचार सुरु आहे. यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील सुकाणू समिती निर्णय घेणार आहे.

टोलमाफीतून होणारी महसुली घट परिवहन विभाग पूरक तरतुदींतून भरून काढणार असल्याची माहिती शासन आदेशात नमूद आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रकल्पांवर कोणताही आर्थिक परिणाम होणार नाही.

Toll Free | अनुदान योजनेचा मोठा लाभ :

राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीसाठी आकर्षक अनुदान योजनाही जाहीर केली आहे. ग्राहकांना थेट फायदा मिळावा यासाठी ही अनुदान रक्कम वाहन उत्पादक कंपन्यांना दिली जाणार आहे आणि कंपन्या त्यानुसार वाहन किमतीत कपात करतील.

राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर दर २५ किमी अंतरावर ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ही पायाभूत सुविधा सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून विकसित केली जाणार आहे, ज्यामुळे ईव्ही वापर अधिक सुलभ होईल.

इलेक्ट्रिक वाहनांसाठी अनुदान तपशील (₹):

दुचाकी: 10,000

तीन चाकी प्रवासी: 30,000

तीन चाकी मालवाहतूक: 30,000

चारचाकी प्रवासी (नॉन-ट्रान्सपोर्ट): 1,50,000

चारचाकी प्रवासी (ट्रान्सपोर्ट): 2,00,000

चारचाकी हलकी मालवाहतूक: 1,00,000

बस (राज्य परिवहन उपक्रम): 20,00,000

बस (खासगी/शहरी): 20,00,000

News Title: After Expressway and Samruddhi, Now Atal Setu Also Toll-Free for Electric Vehicles in Maharashtra

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now