Actress Harassment | बॉलिवूडमध्ये आपल्या ग्लॅमरस स्टाईलसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना शर्मा (Actress Kangana Sharma Harassment) हिने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात आलेल्या कास्टिंग काउचच्या धक्कादायक अनुभवाबद्दल खुलासा केला आहे. एका मुलाखतीत तिने सांगितले की, एका दिग्दर्शकाने तिच्याकडून अत्यंत घाणेरडी मागणी केली होती, ज्यामुळे ती संतापली होती आणि तिने त्या व्यक्तीला त्यावेळी जोरदार फटकारले होते. कंगनाने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले असले तरी, तिच्या ग्लॅमरस स्टाईलसाठी ती अधिक प्रसिद्ध आहे. तिच्या या खुलासामुळे चित्रपटसृष्टीतील कास्टिंग काउचचे भयावह वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.
कंगनाला मोठा धक्का बसला :
कंगना शर्माने (Kangana Sharma) सांगितले की, एका एजन्सीच्या मालकाने तिला फोन केला आणि ती त्यांना भेटायला गेली. तिथे त्या एजन्सीच्या मालकाने तिला विचारले की, “तुम्हाला माहिती आहे ना? किती ग्लॅमरस सीन करावा लागणार आहे.”
अभिनेत्रीने यावर सकारात्मक प्रतिसाद देत म्हटले, “हो, मला माहीत आहे, मला लव्ह मेकिंग सीन्स करायचे आहेत ना?” यावर दिग्दर्शकाने तिला विचारले की, “तू ओरल सीन करशील का?” कंगनाने यालाही ‘हो’ म्हटले. त्यानंतर दिग्दर्शक म्हणाला की, “मग मला काहीतरी वेडेपणा करून दाखव.” दिग्दर्शकाचे हे बोलणे ऐकून कंगनाला मोठा धक्का बसला.
कंगनाने दिग्दर्शकाला शिवीगाळ केली :
यानंतर, त्या व्यक्तीने पुढे जाऊन अत्यंत अश्लील मागणी केली. त्याने कंगनाला तिची अंतर्वस्त्र काढून त्याच्याकडे देण्यास सांगितले. हे ऐकून कंगनाला प्रचंड संताप आला. तिने त्या दिग्दर्शकाला त्वरित विचारले की, “तू माझ्या हातानं मार इथे खाणार की, बाहेर जाऊन खाणार?” कंगनाने त्या दिग्दर्शकाला चांगलाच फटकारले. मात्र, त्यानंतरही तो माणूस शांत बसला नाही. तो म्हणाला की, “मला फक्त तुझा ग्लॅमरस अंदाज पाहायचा होता.” दिग्दर्शकाचे हे बोलणे ऐकून कंगनाने त्याला शिवीगाळ केली आणि तिथून निघून जाण्यास सांगितले. (Actress Kangana Sharma Harassment)
दिग्दर्शकाने कंगनाला बाहेर कोणालाही काहीही सांगू नकोस, अशी धमकीवजा विनंतीही केली. कंगनाच्या या अनुभवाने चित्रपटसृष्टीतील काही वाईट प्रवृत्ती पुन्हा एकदा समोर आल्या आहेत.
Actress Harassment | कंगना शर्मासारख्या अभिनेत्रींनी आपले अनुभव सार्वजनिकपणे मांडले :
अनेक नवोदित कलाकारांना अशा प्रकारच्या कास्टिंग काउचला सामोरे जावे लागते, ज्यामुळे त्यांचे मानसिक खच्चीकरण होते आणि त्यांच्या करिअरवरही परिणाम होतो. कंगनाने धाडसाने हा अनुभव सांगितल्यामुळे अशा प्रवृत्तींविरोधात आवाज उठवणाऱ्यांना बळ मिळू शकते.
एकंदरीत, चित्रपटसृष्टीतील कास्टिंग काउच हे एक गंभीर सत्य आहे, ज्यावर प्रकाश टाकणे आवश्यक आहे. कंगना शर्मासारख्या अभिनेत्रींनी आपले अनुभव सार्वजनिकपणे मांडल्यास अशा प्रकरणांवर नियंत्रण आणण्यास मदत होईल आणि चित्रपटसृष्टीत एक सुरक्षित वातावरण निर्माण होण्यास हातभार लागेल.








