अभिनेता मुकुल देव यांचं निधन; सिनेसृष्टीत शोककळा

On: May 24, 2025 3:34 PM
Mukul Dev
---Advertisement---

Mukul Dev | चित्रपट जगतातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ‘सन ऑफ सरदार’ आणि ‘यमला पगला दीवाना’ सारख्या चित्रपटांमध्ये काम करणारे प्रसिद्ध अभिनेते मुकुल देव यांचे निधन झाले आहे. ते फक्त ५४ वर्षांचा होते. त्यांच्या जाण्यानं सिनेसृष्टीतील कलाकार आणि चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

६० पेक्षा जास्त चित्रपटांत भूमिका :

अभिनेते मुकुल देव (Mukul Dev death) यांनी १९९६ मध्येटेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्यांची पहिली मालिका ‘मुमकिन’ आहे. त्यांनी हिंदीसोबतच पंजाबी, बंगाली, मल्याळम, कन्नड आणि तेलगू भाषांतील ६०हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर प्रचंड प्रसिद्धी मिळवली आहे. त्यांचे लाखो चाहते आहेत. मुकुल देव हे प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता राहुल देव यांचे भाऊ होते.

नवी दिल्लीतील पंजाबी कुटुंबात जन्मलेले मुकुल देव यांचे वडील हरी देव हे असिस्टंट कमिश्नर ऑफ पोलीस होते. बालपणापासूनच त्यांचा सिनेसृष्टीशी संबंध होता. आठवीत असताना त्यांनी दूरदर्शनने आयोजित केलेल्या नृत्य स्पर्धेत मायकल जॅक्सनची नक्कल करून  पहिला पगार मिळवला होता. अभिनयाशिवाय ते इंदिरा गांधी राष्ट्रीय विमान वाहतूक अकादमीचे ट्रेंड पायलट देखील होते.

‘या’ चित्रपटांमध्ये केले होत काम :

मुकुल देव यांनी २०२२ मध्ये ‘अँट द एंड’ या हिंदी चित्रपटात शेवटी काम केले. तसेच, २०१८ मध्ये ‘२१ सरफरोश’ या टेलिव्हिजन सिरीजमध्ये गुल बादशाहच्या भूमिकेत दिसले होते. २०२० मध्ये ते ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘स्टेट ऑफ सीज: २६/११’ या वेब सिरीजमध्येही दिसले होते.

त्यांची प्रकृती गेल्या काही काळापासून ठीक नव्हती. तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. मुकुल देव यांचा मृत्यूव  चित्रपटसृष्टीसाठी एक मोठा धक्का ठरला आहे. त्यांच्या निधनाने मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मुकुल देव यांना अखेरचा निरोप देताना त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या कामगिरीची आठवण नेहमीच राहणार आहे.

Title : Actor Mukul Dev passes away; Film industry in mourning

Join WhatsApp Group

Join Now