अभिनेता गोविंदाच्या हेल्थबद्दल सर्वात मोठी अपडेट समोर!

On: October 2, 2024 1:24 PM
actor govinda big health update
---Advertisement---

Actor Govinda | बॉलीवूड अभिनेता गोविंदा याच्या पायाला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता. गोविंदाच्या हातातील बंदुकीतून मिसफायर होऊन थेट त्याच्या पायात गोळी शिरली, यामुळे तो जखमी झाला. मंगळवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास मुंबईत ही घटना घडली होती. या घटनेनंतर गोविंदाला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या अभिनेत्याची प्रकृती ठीक असून त्याच्या जीवाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही.(Actor Govinda)

गोविंदासोबत झालेल्या या घटनेनंतर चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. अजूनही त्याच्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. गोविंदाला पूर्णपणे ठीक होण्यासाठी किती वेळ लागेल?, त्याला पुन्हा आपल्या पायावर कधी चालता येईल?, असे अनेक सवाल चाहत्यांकडून उपस्थित केले जात आहेत. अशात अभिनेत्याच्या हेल्थबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे.

गोविंदाच्या हेल्थबद्दल मोठी अपडेट

मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदाची प्रकृती पूर्ववत होण्यासाठी आणखी 3 ते 4 आठवडे लागू शकतात. गोविंदाच्या पायातली गोळी काढण्यात आली असून सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याला ठेवण्यात आलं आहे. गोविंदाला अजून 3 ते 4 आठवडे आराम करण्याची गरज असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. (Actor Govinda)

तसेच, अभिनेत्याला चालायचे असले तरी सध्या त्याला वॉकरचा आधार घ्यावा लागणार आहे. बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी गोविंदाची भेट घेऊन त्याची विचारपूस केली. याचे सोशल मीडियावर देखील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या घटनेनंतर मंगळवारी गोविंदा आणि त्याची मुलगी टीना अहुजा यांचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी गोविंदाचा शिंदे गटात प्रवेश

गोविंदा मंगळवारी पहाटे कोलकाता जाण्यासाठी निघाला असताना ही घटना घडली. मात्र, ही घटना नेमकी कशी घडली, याबाबत अद्यापही संभ्रम आणि संशयाचे वातावरण आहे. दरम्यान, अभिनेता गोविंदाने लोकसभा निवडणुकीपूर्वीच शिंदे गटात प्रवेश केला होता. तेव्हा अभिनेता वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्याने लोकसभा निवडणूक लढवली नाही. आता गोविंदा या घटनेमुळे चर्चेत आला आहे. (Actor Govinda)

News Title – actor govinda big health update

महत्वाच्या बातम्या-

दिवाळी गिफ्ट! फक्त 13 हजार रुपये भरा आणि iPhone 16 मिळवा

यादी तयार! रोहित पवार, राजेश टोपेंसह 50 मोठे नेते पाडणार; कोणी दिला इशारा?

मुंबई मेट्रोत नोकरीची सुवर्णसंधी, इच्छुक उमेदवारांनी ‘असा’ करावा अर्ज!

‘या’ बड्या नेत्याला घेण्यासाठी जाताना कोसळलं हेलिकॉप्टर; तीन जणांचा मृत्यू

ब्रेकिंग! पुण्यातील ‘या’ भागात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू

Join WhatsApp Group

Join Now