Forest Fire | उन्हाळ्याच्या सुरुवातीला वनक्षेत्रामध्ये वणवा लागण्याच्या घटना वाढू लागतात. पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) आणि पुणे (Pune) शहराभोवती अनेक टेकड्या आहेत, तिथे वनक्षेत्र असून, तिथे सातत्याने आगी लागतात. काही ठिकाणी टवाळखोर मुद्दामहून आग लावण्याचे काम करतात. अशांवर कारवाई करण्याचा इशारा वन विभागाने दिला आहे. (Forest Fire)
वनक्षेत्रात आगीच्या घटना
मावळ तालुक्यात वडगाव (Vadgaon) आणि शिरोता (Shirota) अशी दोन वनपरिक्षेत्रे आहेत. दोन्ही परिक्षेत्रात 21 हजार हेक्टरमध्ये गस्त वाढविण्यात आली आहे. मावळ तालुक्यातून पुणे-मुंबई महामार्ग, तसेच पुणे-द्रुतगती मार्ग जातात. या रस्त्यांवरून प्रवास करणारे विडी-सिगारेट टाकतात, ज्यामुळे आगी लागतात.
वनविभागाचा इशारा
वनपरिक्षेत्रात आग लावणे हा गुन्हा आहे. दोन वर्षांची शिक्षा, तसेच दंडदेखील होऊ शकतो. वनपरिक्षेत्रात गस्त वाढवली आहे. महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारक व प्रवाशांनी, तसेच पर्यटकांनी सिगारेट किंवा इतर ज्वलनशील पदार्थ, वस्तू वनपरिक्षेत्रात टाकू नयेत, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी, वडगाव मावळ, प्रकाश शिंदे (Prakash Shinde) यांनी केले आहे.
आगीमधील नुकसान
आगीत छोटे वन्यजीव होरपळतात, तर निसर्गप्रेमींनी लावलेली रोपे खाक होतात. उन्हाळ्यात गवत वाळलेले असते. ठिणगी पडली तरी आग लागून मोठ्या प्रमाणावर पसरते. वनविभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने अशा घटनांना आळा घालणे सहज शक्य होत नाही.
दोन महिन्यांत सहा घटना
मावळात वनपरिक्षेत्रात दोन महिन्यांमध्ये आगीच्या सहा घटना घडल्या. यात रस्त्याच्या कडेला असलेल्या गवताला आग लागण्याचे प्रकार जास्त आहेत. (Forest Fire)
Title : Action Against Those Who Set Forest Fire Increased Patrol in Maval Forest Area






