मोठी बातमी! आमदार बच्चू कडूंचा अपघात

On: January 11, 2023 11:12 AM
---Advertisement---

मुंबई | महाराष्ट्रातील नेतेमंडळीच्या अपघाताची मालिका सुरुच आहे. नुकताच प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचा अपघात झाला आहे.

अमरावतीत बच्चू कडूंचा अपघात झाला. सकाळी सहा ते साडेदहाच्या दरम्यान हा अपघात झाला आहे. रस्ता ओलांडताना एका दुचाकीने त्यांना धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी झाल्याचं दिसत आहे.

कडू यांच्या हाताला, पायाला जबर दुखापत झाली आहे. डोक्याला 4 टाके बसले असल्याचं सांगितलं जात आहे. यासंबंधी बच्चू कडूंनी ट्विट (Tweet) देखील केलं आहे. माझी प्रकृती ठीक असून डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार मला विश्रांतीची गरज आहे,. असं ते या ट्विटमध्ये म्हणाले.

काही दिवसांपूर्वी कारला टँकरने मागून धडक दिल्याने आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्या गाडीला अपघात झाला होता. तो घातपात होता का? याची चौकशी व्हावी, अशी मागणी माजी मंत्री रामदास कदम(Ramdas Kadam) यांनी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp Group

Join Now