अभिषेक बच्चनच्या आयुष्यात नवी मिस्ट्री गर्ल?, होळी पार्टीतील फोटो तूफान व्हायरल

On: March 18, 2025 2:44 PM
Abhishek Bachchan and Tabus Viral Photo
---Advertisement---

Abhishek Bachchan | बॉलिवूडमधील सेलिब्रिटींचे अफेअर्स आणि वैयक्तिक नाती नेहमीच चर्चेचा विषय असतात. नुकताच अभिषेक बच्चन आणि तब्बू यांचा एक जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे अनेकांना धक्का बसला असून, दोघे कधीकाळी एकत्र होते का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. (Abhishek Bachchan)

तब्बू आणि अभिषेक बच्चनचा व्हायरल फोटो

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोत तब्बू पांढऱ्या ट्रेडिशनल आऊटफिटमध्ये दिसत आहे, तर अभिषेक होळीच्या रंगात माखलेला आहे. फोटोमध्ये अभिषेकने तब्बूला दोन्ही हातांनी पकडल्याचे दिसत आहे आणि तब्बू मनमुराद हसताना पाहायला मिळते.

रेडिटवर हा फोटो शेअर करत एका युजरने लिहिले की, “अभिषेक आणि तब्बू 2005 च्या होळी पार्टीमध्ये आपल्या लव्ह अफेअर दरम्यान…” असेही बोलले जात आहे की, दोघे अनेकदा एकत्र दिसायचे आणि महागड्या हॉटेल्समध्येही त्यांना स्पॉट केले गेले होते. मात्र, या गोष्टींची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

लग्नाआधी अभिषेकच्या नात्यांबद्दल अनेक चर्चा 

अभिषेक बच्चनचे नाव ऐश्वर्या रायशी लग्न होण्याआधी करिश्मा कपूरसोबत जोडले गेले होते. दोघांचा साखरपुडाही झाला होता, मात्र काही कारणांमुळे हे नातं तुटलं. त्यानंतर ऐश्वर्या राय आणि अभिषेक एकत्र आले.

तसेच काही दिवसांपूर्वी अभिषेक आणि निमरत कौर यांचे नाते तणावात असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र, ऐश्वर्या आणि अभिषेक नंतर अनेकदा एकत्र दिसले आणि त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. (Abhishek Bachchan)

दरम्यान, अभिषेक आणि तब्बू यांच्या व्हायरल फोटोवर अनेक कमेंट्स येत आहेत. एका युजरने लिहिले, “हे कधी घडले? अजिबात माहित नव्हतं!” दुसऱ्याने मजेशीर प्रतिक्रिया देत म्हटले, “तब्बूवर एक बायोपिक यायलाच हवा – नागार्जुन, अजय देवगण आणि आता अभिषेक?”काहींनी अभिषेकबद्दल सहानुभूती व्यक्त करत म्हटले, “फेलियर टॅगबाबत सहानुभूती होती, पण आता सगळं संपलं!”

Title : Abhishek Bachchan and Tabus Viral Photo

 

Join WhatsApp Group

Join Now