आमिर खान एक्स-बायकोच्या घरी पोहचला गर्लफ्रेंडसोबत! पडद्यामागचं रहस्य आलं समोर?

On: April 28, 2025 12:23 PM
Aamir Khan
---Advertisement---

Aamir Khan | बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) पुन्हा एकदा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. नुकताच आमिर खान त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट आणि मुलगा जुनैदसोबत त्याच्या पहिल्या पत्नी रिना दत्ताच्या घराजवळ दिसला. सोशल मीडियावर या भेटीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे आणि चाहत्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

आमिर खानने आपल्या 60 व्या वाढदिवसानिमित्त सर्वांसमोर आपल्या नवीन गर्लफ्रेंडची ओळख करून दिली होती. बेंगळुरूमधील गौरी स्प्रॅटसोबत तो गेल्या 18 महिन्यांपासून डेट करत आहे. दोघांची 25 वर्षांची ओळख आहे. गौरी ही एक प्रसिद्ध ब्युटी एक्स्पर्ट असून तिचे बेंगळुरूमध्ये आणि मुंबईत ‘बी ब्लंट’ नावाचे सलॉन आहे. गौरीला सहा वर्षांचा मुलगाही आहे.

सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे विविध प्रतिक्रिया :

आमिर, गौरी आणि जुनैदचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही युजर्सनी ‘सगळ्यात हटके फॅमिली’ असे म्हणत कौतुक केले, तर काहींनी ‘इतके मोकळे विचार कुठून येतात?’ असा सवाल केला. काहीजणांनी टीकाही केली की, ‘मुलगा लग्नाच्या वयात आहे आणि बाप अजूनही गर्लफ्रेंड फिरवतोय’.

यावरून स्पष्ट होते की, आमिरच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकतेचा विषय असतात. मात्र आमिरने अनेकदा स्पष्ट केले आहे की, तो आपले नातेसंबंध खुल्या मनाने आणि प्रामाणिकपणे जगतो.

Aamir Khan l आमिर खान आणि गौरी स्प्रॅटचे नाते :

आमिर आणि गौरीमध्ये जवळपास 14 वर्षांचे वयाचे अंतर आहे. आमिर सध्या 60 वर्षांचा आहे, तर गौरी 46 वर्षांची आहे. त्यांच्या नात्याबद्दल फार आधीपासून चर्चा होती, पण नुकतीच अधिकृत घोषणा झाली आहे. गौरीने लंडनमध्ये फॅशन स्टायलिंग आणि फोटोग्राफीचे शिक्षण घेतले आहे. तिची प्रोफेशनल कारकीर्द बरीच मजबूत आहे.

आमिर खानचे याआधी दोन लग्न झाले होते. पहिली पत्नी रिना दत्ता आणि दुसरी पत्नी किरण रावसोबत विभक्त झाल्यानंतर आता आमिरने पुन्हा नव्या प्रेमात पाऊल टाकले आहे. त्याच्या पहिल्या दोन लग्नांमधून त्याला तीन मुलं – आयरा, जुनैद आणि आझाद आहेत.

News Title: Aamir Khan Visits Ex-Wife’s Home with Girlfriend Gauri Spratt and Son Junaid, Sparks Buzz

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now