उमेदवार यादी जाहीर होण्याआधीच भाजपला मोठा धक्का!

On: October 18, 2024 1:52 PM
BJP
---Advertisement---

BJP | येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक घोषित केली. राज्यातील विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज भाजपची उमेदवार यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधीच भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे.

महायुतीने अद्याप उमेदवारी यादी जाहीर केलेली नाही. मात्र त्याआधी नाराजीनाट्य रंगत असल्याचं दिसत आहे. गणेश नाईक (Ganesh Naik) भाजपा सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.

भाजपला मोठा धक्का

बेलापूर, ऐरोली मतदारसंघावर गणेश नाईकांचा दावा असून, जर या दोन्ही ठिकाणी उमेदवारी मिळाली नाही तर ते पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचं समजतंय.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये पक्षांतराची लाट आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आपल्याला तिकीट मिळणार नाही याची चाहूल लागल्यानंतर अनेकजण अगदी पक्ष बदलून विरोधी विचारसरणीच्या पक्षात प्रवेश मिळतो का याची चाचपणी करु लागले आहेत.

नारायण राणेंना मोठा धक्का

दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनं नारायण राणेंना मोठा धक्का दिला आहे. नाराणय राणेंबरोबर शिवसेना सोडणारा एक महत्त्वाचा नेता आता स्वगृही म्हणजेच ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे.

सावंतवाडीतून एकनाथ शिंदेंच्या पक्षातील दीपक केसरकर यांच्या विरोधात राजन तेली यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून संधी दिली जाणार आहे. त्यामुळे यंदा सावंतवाडीमधील निवडणुकीची चूरस अधिक वाढणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘या’ अभिनेत्रीसाठी अभिषेकने ऐश्वर्याला फसवलं?, खळबळजनक माहिती समोर

अजित पवारांना धक्क्यावर धक्के; आधी 600 आता तब्बल ‘इतक्या’ पदाधिकाऱ्यांचा राजीनामा?

नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

विधानसभेपूर्वीच राज्यात राजकीय स्फोट?, बच्चू कडूंच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ

बिश्नोईच्या धमकीनंतर सलमान खानने खरेदी केली बुलेट प्रुफ कार; किंमत ऐकून व्हाल थक्क

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now