अजित पवारांना मोठा धक्का, बारामतीही हातातून जाणार?

Ajit Pawar | बारामती लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. अजित पवार यांचा मतदार संघ असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघातून शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी लीड मिळाली आहे. राष्ट्रवादी पक्षात मोठी फूट पडल्यानंतर बारामतीतील ही पहिलीच लोकसभा निवडणूक होती. मात्र यात अजित पवारांना (Ajit Pawar) मोठा धक्का बसणार असल्याचं दिसतंय. कारण अजित पवारांचे (Ajit Pawar) सर्व उमेदवार पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय.

अजित पवारांना मोठा धक्का

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारली आहे. शरद पवारांनी महाविकास आघाडीमध्ये 10 जागांवर निवडणूक लढवली होती, त्या दहाही जागांवर उमेदवार आघाडीवर आहेत.

पाचव्या फेरी अखेर शिरुरमधुन अमोल कोल्हे आघाडीवर आहेत. अमोल कोल्हे यांनी 25088 मतांनी आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजी आढळराव पाटील पिछाडीवर आहेत.

भाजपचे सुजय विखे पाटील पिछाडीवर आहेत. निलेश लंके यांनी 11 वाजेपर्यंतच्या कलामध्ये मोठी आघाडी घेतली आहे.

सातऱ्यात शशिकांत शिंदेंनी मोठी आघाडी घेतली आहे. उदयनराजे भोसले यांना मोठा झटका बसला आहे.

भाजपचे रणजीतसिंह निंबाळकर पिछाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोठी आघाडी घेतली आहे.

भिवंडीमध्ये राज्यमंत्री कपिल पाटील यांना जोरदार धक्का बसला आहे. बाळ्यामामा म्हात्रे यांनी मोठी आघाडी घेतली आहे

महत्त्वाच्या बातम्या- 

साताऱ्यात शशिकांत शिंदे विरूद्ध उदयनराजे भोसले; कोण आघाडीवर? जाणून घ्या अपडेट

राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांचं निकालाबाबत मोठं भाकीत!

महाराष्ट्रात महायुतीला फटका?; ‘या’ जागांवर महाविकास आघाडी सुसाट

अहमदनगर लोकसभेची गणित फिरली; आकडेवारीत झाला मोठा फेरबदल

तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यास नरेंद्र मोदी ‘हा’ विक्रम मोडणार?