आज श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन, ‘या’ 6 वस्तु दान करा, घरात राहील भरभराट

On: March 31, 2025 10:40 AM
Swami Samarth Prakat Din
---Advertisement---

Swami Samarth Prakat Din | श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापासून ते स्मरण दिनापर्यंतचा काळ भक्तांसाठी अत्यंत शुभ मानला जातो. 31 मार्च 2025 रोजी प्रकट दिन आणि 26 एप्रिल 2025 रोजी स्मरण दिन आहे. या कालावधीत 6 गुरुवार येत असून, त्या दिवशी विशिष्ट सेवा आणि दान केल्यास वर्षभर सुख, समाधान आणि स्वामींची कृपा लाभते, असे मानले जाते.

स्वामी समर्थ (Shree Swami Samarth) यांच्या प्रकट दिनी आणि नंतर येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी, तसेच स्मरण दिनी भाविकांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले पाहिजे. या दिवशी शक्य असल्यास खालीलप्रमाणे 6 वेगवेगळ्या गोष्टींचे दान करावे. या उपायांमध्ये पिवळ्या रंगाच्या वस्तूंचा समावेश असेल तर तो अधिक फलदायी मानला जातो.

‘या’ 6 वस्तूंचे करा दान 

पहिला गुरुवार: हिंदू नववर्षाच्या पहिल्या गुरुवारी पिवळ्या वस्त्रांचे दान करावे. यामध्ये पितांबर, उपरणं, साडी किंवा ब्लाउजपीस यांचा समावेश होतो. हे वस्त्र गुरुजी, पूजारी किंवा गरजूंना श्रद्धेने दान करावे.

दुसरा गुरुवार: पिवळ्या पेढ्यांचे दान करावे. मंदिरात किंवा स्वामी मठात आलेल्या भक्तांना पेढा प्रसाद स्वरूपात वाटावा. या छोट्याशा कृतीने प्रसन्नता आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते.

तिसरा गुरुवार: ऋतुमानानुसार मिळणाऱ्या पिवळ्या फुलांनी स्वामींची सेवा करावी. फुले श्रद्धेने वाहावीत. केवळ पुष्प नव्हे, तर त्या मागचा भाव भक्तीपूर्ण असावा.

चौथा गुरुवार: गूळ, चणे आणि फुटाणे यांचा नैवेद्य दाखवून, त्याचा प्रसाद भक्तांना वाटावा. यथाशक्ती मंदिरातील दानपेटीत गुप्त दान करावे. यामुळे ‘देण्याची वृत्ती’ विकसित होते.

पाचवा गुरुवार: गरजू विद्यार्थ्यांना पिवळ्या वस्त्रांचे साहित्य, वही-पेन किंवा जे शक्य होईल ती वस्तू दान करावी. शिक्षणासाठी केलेले दान भविष्य घडवते.

सहावा गुरुवार (स्मरण दिन): पिवळ्या फळांचे वाटप करावे. केळी, संत्री, आंबा यासारखी फळे मंदिरात किंवा स्वामी भक्तांना दिल्यास शुभ फळ मिळते. हे दान स्मरण दिनाच्या दिवशी केले असता स्वामींच्या कृपाशीर्वादाची अनुभूती येते.

अढळ श्रद्धेने सेवा केल्यास संकटे टळतील

ज्यावेळी जीवनात अडथळे, अडचणी, आर्थिक अडचण, मानसिक तणाव वाढतो, त्यावेळी स्वामी सेवा केलेली मनाला आधार देते. भक्तांनी या काळात आपली श्रद्धा अढळ ठेवून सेवा केली, तर स्वामींचा आशीर्वाद मिळून संकटातून मार्ग निघतो, असे म्हटले जाते.

श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण, मंदिरभेट, सेवा आणि दान या साधनांद्वारे नकारात्मकता दूर होते, आणि भक्ताच्या जीवनात नवचैतन्य निर्माण होते. म्हणून प्रकट दिन ते स्मरण दिन या काळात हा उपाय न चुकता करावा.

Title : 6 Holy Donations During Swami Samarth Prakat Din

 

Join WhatsApp Group

Join Now