हृदय निरोगी ठेवण्यासाठी लावा ‘या’ ५ सवयी

On: February 27, 2025 1:50 PM
Triglycerides Heart Risk
---Advertisement---

heart health tips | जगभरात हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक) हा मृत्यूचे एक प्रमुख कारण मानले जाते. पूर्वी हा आजार प्रामुख्याने वृद्धांमध्ये दिसून येत होता, मात्र सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे तरुण वयोगटातही हृदयविकाराचा धोका वाढत आहे. चुकीच्या आहाराच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि तणाव यामुळे हा धोका अधिक गंभीर बनत आहे. त्यामुळे हृदयाचे आरोग्य टिकवण्यासाठी काही सवयी अंगीकारणे आवश्यक आहे. (heart health tips)

‘या’ सवयी लावा

सकाळच्या वेळेचा आपल्या आरोग्यावर मोठा प्रभाव पडतो. झोपेतून उठल्यावर योग्य सवयी अंगीकारल्यास हृदय मजबूत राहते, रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित राहते, तसेच हृदयविकाराचा धोका टाळता येतो. नाश्त्यापूर्वीच्या या ५ सवयी स्वीकारल्यास संपूर्ण शरीराला फायदा होईल.

१) उपाशीपोटी पाणी प्या

सकाळी उठल्यानंतर दोन ग्लास कोमट पाणी पिणे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि रक्ताभिसरण सुधारते. नियमितपणे उपाशीपोटी पाणी प्यायल्यास रक्तदाब संतुलित राहतो, हृदयाचे स्नायू मजबूत होतात आणि हृदयविकार व स्ट्रोकचा धोका कमी होतो.

२) सकाळच्या उन्हात बसा

कोवळ्या सकाळच्या उन्हात बसल्याने शरीराला नैसर्गिक व्हिटॅमिन डी मिळते, जे हाडांसाठी आणि हृदयासाठी आवश्यक असते. संशोधनानुसार, शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे दररोज किमान १० ते १५ मिनिटे उन्हात बसणे आवश्यक आहे, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदय निरोगी राहते.

३) उठल्यावर लगेच फोन वापरणे टाळा

अनेक लोक सकाळी उठताच सर्वप्रथम मोबाईल फोन तपासण्याची सवय लावून घेतात. मात्र, हा सवय तणाव वाढवू शकते. सकाळी उठल्यानंतर काही वेळ डिजिटल डिटॉक्स घेतल्याने मानसिक तणाव कमी होतो, स्ट्रेस हार्मोन कमी होतात आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. दिवसाची सुरुवात ध्यान किंवा श्वासावरील व्यायामाने केल्यास मानसिक स्थैर्य मिळते आणि हृदयावर अनावश्यक ताण येत नाही.

४) सकाळी शरीर सक्रिय ठेवा

सकाळी हलका व्यायाम, योगा किंवा चालण्याची सवय लावल्यास हृदयाचे आरोग्य चांगले राहते. शारीरिक हालचालीमुळे रक्ताभिसरण सुधारते, कोलेस्टेरॉल पातळी नियंत्रित राहते आणि हृदयाची कार्यक्षमता वाढते. दररोज ३० मिनिटे व्यायाम केल्यास हृदयविकाराचा धोका ३० टक्क्यांपर्यंत कमी होतो. (heart health tips)

५) पौष्टिक नाश्ता करा

दिवसाची सुरुवात सकस आणि पोषणयुक्त नाश्त्याने करणे गरजेचे आहे. मोड आलेली कडधान्ये, फळे, नट्स आणि प्रोटीनयुक्त पदार्थ यांचा समावेश केल्यास शरीराचे चयापचय (मेटाबॉलिझम) चांगले राहते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. सकाळच्या नाश्त्यात तळलेले, मसालेदार पदार्थ टाळावेत, कारण हे पदार्थ कोलेस्टेरॉल वाढवतात आणि हृदयविकाराचा धोका वाढवू शकतात. (heart health tips)

Title : 5 heart health tips

 

Join WhatsApp Group

Join Now