आधार कार्ड संबंधित सगळी कामं झटपट होणार; माहिती तंत्रज्ञान विभागाचा मोठा निर्णय

On: February 27, 2025 11:41 AM
Aadhaar Card Alert
---Advertisement---

 Aadhaar Card | राज्यात नवीन आधार (Aadhaar Card) नोंदणी आणि जुन्या आधार क्रमांकांच्या अद्ययावत प्रक्रियेसाठी लागणाऱ्या यंत्रांची कमतरता दूर करण्यासाठी, माहिती व तंत्रज्ञान विभागाने २९११ नवीन आधार यंत्रे देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच ही यंत्रे संपूर्ण महाराष्ट्रात वितरित केली जाणार आहेत. यातील सर्वाधिक २०३ यंत्रे पुणे (Pune) जिल्ह्याला मिळणार आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

पुणे जिल्ह्याला सर्वाधिक आधार यंत्रे

माहिती व तंत्रज्ञान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या आठवड्यात ही नवीन आधार यंत्रे जिल्ह्यांमध्ये पोहोचणार आहेत. पुणे जिल्ह्याला सर्वाधिक २०३ यंत्रे मिळतील, ज्यामुळे नागरिकांना आधार संबंधित कामे करणे अधिक सोपे होईल.

प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात २ हजार ९११ यंत्रे सर्व ३६ जिल्ह्यांना देण्यात येणार आहेत. ही यंत्रे संबंधित जिल्ह्यांमध्ये लवकरच पोहचतील. राज्यासाठी आणखी सुमारे १ हजार २०० यंत्रांची मागणी नोंदविण्यात आली आहे. २०१४ मध्ये ३ हजार ८७३ आधार यंत्रे देण्यात आली होती, परंतु त्यापैकी २ हजार ५५८ यंत्रेच सध्या कार्यरत आहेत. उर्वरित यंत्रे नादुरुस्त आहेत.

आधार यंत्र वाटपाची प्रक्रिया

नवीन यंत्रे देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना एक कार्यपद्धती निश्चित करण्यास सांगितले आहे. जिल्हा समन्वयक अधिकारी, जिल्हा प्रकल्प प्रबंधक आणि जिल्हा आयटी समन्वय यांना हे काम सोपविण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यपद्धती निश्चित केल्यानंतर, ही यंत्रे देण्यासाठी एका परीक्षेचे आयोजन केले जाईल. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडे यंत्रे सोपविली जातील. त्यानंतरच नवीन आधार तसेच आधार अद्ययावतीकरण करणे शक्य होईल. तोपर्यंत नागरिकांना जुन्या यंत्रांवरच काम करावे लागेल, अशी माहिती आहे. (Aadhaar Card)

Title : 2911 New Aadhaar Card Centers in Maharashtra Pune Gets Maximum

 

Join WhatsApp Group

Join Now