आज ‘या’ राशीच्या व्यक्तींनी विरोधकांपासून सावध राहा!

On: November 27, 2025 9:22 AM
Today Horoscope
---Advertisement---

Today Horoscope | ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडली आणि ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींवरून दैनंदिन घडामोडींचे अंदाज व्यक्त केले जातात. दैनंदिन राशीभविष्यामध्ये नोकरी, व्यवसाय, कुटुंब, आरोग्य आणि आज दिवसभरात काय घडू शकते याचे संकेत मिळतात. आज गुरुवार, 27 नोव्हेंबर 2025 रोजी तुमच्या राशीचा दिवस कसा जाणार आहे? हे जाणून घेण्यासाठी वाचा आजचे सविस्तर राशीभविष्य.

मेष राशी (Aries Daily Horoscope) : आज तुमच्यासाठी काहीतरी नवीन शिकण्याचा योग आहे. जुन्या मित्राला मदत केल्याने मन समाधानी राहील. दैवी पाठिंबा लाभेल आणि कामात वेग येईल. मात्र विरोधक खोडा घालण्याचा प्रयत्न करतील, त्यामुळे सावध रहा. स्टील व्यवसाय करणाऱ्यांना जास्त नफ्याची संधी मिळेल.

वृषभ राशी (Taurus Daily Horoscope) : आजचा दिवस तुम्हाला बदलांचा अनुभव देईल. तणाव वाढू शकतो, पण प्रलंबित कामे पुन्हा सक्रिय होतील. तुमच्या मदतशील स्वभावामुळे सहकारी तुम्हाला साथ देतील. चुकीची संगत टाळा, अन्यथा आर्थिक तोटा संभवतो.

मिथुन राशी (Gemini Daily Horoscope) : आज प्रवासाचा योग असून नवीन ठिकाणांना भेट देता येईल. मनातील तणाव दूर होईल आणि कार्यक्षमता वाढेल. वडिलधाऱ्यांच्या आशीर्वादाने मोठे काम सुटेल. कुटुंबातील प्रेम आणि आपुलकी वाढेल.

कर्क राशी (Cancer Daily Horoscope) : अनावश्यक खर्च टाळा. नोकरी करणाऱ्यांचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना आज जास्त नफा मिळेल. घर खरेदीचा किंवा मालमत्ता गुंतवणुकीचा योग संभवतो. विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती दिसेल.

सिंह राशी (Leo Daily Horoscope) : आज धर्मस्थळाला भेट देण्याचे योग आहेत. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः सर्दी-खोकल्यामुळे ताप येऊ शकतो. कामाच्या धावपळीतही सकारात्मकता टिकून राहील. विरोधक त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतात, सावध राहणे आवश्यक आहे.

कन्या राशी (Virgo Daily Horoscope) : आज उत्साह भरपूर राहील. सोशल मीडियावर तुमचे व्हिडिओ किंवा पोस्ट्स लोकप्रिय होतील आणि फॉलोअर्स वाढतील. सरकारी कामात यश मिळण्याची शक्यता आहे. आवडती वस्तू मिळाल्याने मन प्रसन्न राहील.

तुळ राशी (Libra Daily Horoscope) : कठोर परिश्रमाचे फळ आज मिळेल. वाहतूक संबंधित व्यवसायिकांना चांगला नफा मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. ऑफिसमधील काम वेळेत पूर्ण करा, अन्यथा ओव्हरटाईम करावा लागू शकतो.

वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope) L आज खूप धावपळ आणि मेहनत करावी लागू शकते. तुमचे प्रयत्न वरिष्ठांच्या नजरेत येतील. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल आणि आत्मविश्वास वाढेल. प्रवासाचा योग संभवतो.

धनु राशी (Sagittarius Daily Horoscope) : आजचा दिवस अत्यंत आनंददायी आहे. धार्मिक कामात सहभाग घ्याल. कुटुंबासोबतची सहल रद्द होण्याची शक्यता आहे, पण त्याऐवजी कामात यश मिळेल. बॉस तुमच्या कामाचे कौतुक करून पगारवाढ देऊ शकतो. विरोधकांपासून सावध राहा.

मकर राशी (Capricorn Daily Horoscope) : उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना आराम जाणवेल. करिअरविषयी चिंता असेल, पण स्वतःवरचा विश्वास वाढवणे आवश्यक आहे. घाबरून न जाता शांत मनाने निर्णय घेणे तुमच्यासाठी चांगले ठरेल.

कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope) : आयुष्यात नवा टप्पा सुरू करण्याची संधी मिळेल. सकारात्मकता राखा. व्यवसायात बाहेरील व्यक्तीकडून मदत मिळेल आणि फायदेशीर करार होऊ शकतो. आश्चर्यकारक भेट मिळण्याची शक्यता आहे.

मीन राशी (Pisces Daily Horoscope) : साहित्य क्षेत्रातील लोकांना आज सन्मान मिळेल. मालमत्ता खरेदी-विक्री करणाऱ्यांना योग्य व्यक्तींची भेट होईल. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे.

News title : 27 november 2025 today horoscope

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now