प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसरची गोळ्या झाडून हत्या; लाईव्ह स्ट्रीमिंगदरम्यान घडला प्रकार

On: May 15, 2025 5:30 PM
Kolhapur Crime
---Advertisement---

Social Media Influencer | मेक्सिकोमधील जलिस्को येथे एका २३ वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएंसर तरुणीची टिकटॉक लाईव्ह सुरू असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना जापोपान शहरात घडली असून वलेरिया मार्केज असे मृत इन्फ्लुएंसरचे नाव आहे. ती एका ब्युटी सलूनमध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग करत असताना तिच्यावर अचानक गोळीबार झाला.

ईव्ह स्ट्रीमिंगचा हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल :

व्हिडिओमध्ये वलेरिया मार्केज एका डिलिव्हरी बॉयसोबत बोलत होती, त्याच वेळी तिच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळ्या झाडल्या. गोळ्या तिच्या छातीत आणि डोक्यात लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. वलेरियाच्या डोक्यात गोळी लागताच रक्ताचे फवारे समोरच्या टेबलवर उडाले. तिच्या लाईव्ह स्ट्रीमिंगचा हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

या घटनेनंतर काही तासांतच त्याच परिसरातील एका कॅफेत एका राजकीय पक्षाच्या माजी खासदाराचीही गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पीआरआय पक्षाचे माजी खासदार लुइस आर्मांडो कॉर्डोवा डियाज हे मारले गेले. एकाच शहरात काही तासांच्या अंतरात दोन मोठ्या हत्या झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

Social Media Influencer | मृत वलेरिया मार्केज ही सोशल मीडिया इन्फ्लुएंसर होती :

मृत वलेरिया मार्केज ही २३ वर्षांची प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर होती. ती सौंदर्य उत्पादनांचे ऑनलाइन मार्केटिंग करत असे. इन्स्टाग्राम आणि टिकटॉक या दोन्ही प्लॅटफॉर्मवर तिचे जवळपास दीड लाख फॉलोअर्स होते.

तिच्या अकाऊंटवर तिच्या चाहत्यांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. पोलिसांनी या दोन्ही हत्या प्रकरणांचा तपास सुरू केला असून, मारेकऱ्यांचा शोध घेतला जात आहे. लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये हत्या कैद झाल्यामुळे पोलिसांना तपासात मदत मिळण्याची शक्यता आहे.

News Title: 23-Year-Old Social Media Influencer Murdered During Live Stream, Incident Captured on Camera

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now