Ambedkar Universities List l भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि समाज सुधारक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती आज देशभरात साजरी होत आहे. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा अमूल्य संदेश देणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांचा (Dr. bahasaheb ambedkar) प्रभाव केवळ सामाजिक क्षेत्रापुरताच मर्यादित नाही, तर शिक्षण क्षेत्रातही तेवढाच प्रभावशाली आहे. याचंच जिवंत उदाहरण म्हणजे त्यांच्या नावाने देशभरात उभारलेली विद्यापीठं.
ज्यांनी शाळेबाहेर बसून शिक्षण घेतलं, त्यांच्या नावाने आज भारतात तब्बल १४ विद्यापीठं कार्यरत आहेत. त्यातील दोन विद्यापीठं ही मुक्त विद्यापीठं असून, देशभरातील कोट्यवधी विद्यार्थी या संस्थांमधून शिक्षण घेत आहेत. हे पाहून नक्कीच प्रत्येकाला थक्क व्हायला होतं.
दोन मुक्त विद्यापीठांनाही बाबासाहेबांचं नाव :
गुजरातमधील गांधीनगर येथील आणि तेलंगणामधील हैदराबाद येथील दोन मुक्त विद्यापीठांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात आलं आहे. देशात एकूण १८ मुक्त विद्यापीठं असून त्यापैकी ही दोन विद्यापीठं बाबासाहेबांचं विचारधन पुढे नेत आहेत. शैक्षणिक स्वातंत्र्य, प्रवेशयोग्यता आणि दर्जात्मक शिक्षण यांचा संगम या विद्यापीठांमधून होताना दिसतो. (Ambedkar Universities List)
महाराष्ट्रात तर बाबासाहेबांविषयी विशेष अभिमानाची भावना आहे. राज्यात १२० हून अधिक वसतिगृहांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात आलं आहे. याशिवाय हजारो शाळा, महाविद्यालयं आणि संस्थाही त्यांच्या नावाने शिक्षणाचा प्रकाश देत आहेत.
Ambedkar Universities List l डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात आलेल्या विद्यापीठांची संपूर्ण यादी:
1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर
2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र विद्यापीठ, लोणेरे, रायगड
3) बाबासाहेब भीमराव आंबेडकर, बिहार युनिव्हर्सिटी, मुझफरपूर
4) बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठ, लखनौ, उत्तर प्रदेश
5) डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जालंधर
6) डॉ. बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी दिल्ली, नवी दिल्ली
7) डॉ. बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी, इटचेर्ला, आंध्र प्रदेश
8) डॉ. बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी ऑफ सोशियल सायन्सेस, इंदूर
9) डॉ. भीमराव आंबेडकर युनिव्हर्सिटी, आग्रा
10) डॉ. आंबेडकर लॉ युनिव्हर्सिटी, चेन्नई
11) डॉ. बी.आर. आंबेडकर स्कूल ऑफ इकोनॉमिक्स, बंगळुरू, कर्नाटक.
12) डॉ. बी. आर. आंबेडकर राष्ट्रीय विधी विद्यापीठ, सोनपत, हरियाणा
13) डॉ. भीमराव आंबेडकर विधी विद्यापीठ, जयपूर, राजस्थान.
14) बाबासाहेब आंबेडकर एज्युकेशन युनिव्हर्सिटी, कोलकाता, पश्चिम बंगाल






