मौल्यवान धातू खरेदी करायचा विचार करताय? तर जाणून घ्या आजचे सोनं व चांदीचे दर

On: February 13, 2025 9:35 AM
Gold and Silver Rate
---Advertisement---

Gold Silver Rate l सोनं आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजचे दर जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कारण सोन्याचा भाव दररोज बदलत असतो, तर चांदीचा भाव देखील सोन्याप्रमाणेच बदलत असतो. तर आज आपण जाणून घेऊयात या मौल्यवान धातूचे आजचे दर काय आहे.

आजचे सोन्याचे दर? :

सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये चढउतार नेहमीच होत असतात. अनेक घटक या दरांवर परिणाम करतात, जसे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, आर्थिक परिस्थिती आणि मागणी-पुरवठा. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी या सर्व गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे.

गेल्या आठवड्यात सोने तब्बल 1500 रुपयांनी वधारले होत, तर 440 रुपयांनी उतरले होते. तर या आठवड्याच्या सुरवातीला म्हणजेच सोमवारी सोने 400 आणि मंगळवारी 320 रुपयांनी महागले होते. तर बुधवारी सोने 710 रुपयांनी आपटले होते.

गुडरिटर्न्सनुसार, आज 22 कॅरेट सोने 79,550 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 86,820 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

Gold Silver Rate l चांदीचे आजचे दर ? :

याशिवाय चांदीच्या किंमती देखील गगनाला भिडल्या आहेत. कारण 5 फेब्रुवारी रोजी चांदी 1000 रुपयांनी वधारली होती. तेव्हापासून ते कालपर्यंत म्हणजेच 12 तारखेपर्यंत चांदीत कोणताही बदल झालेला नाही.

मात्र किंमतीत मोठा बदल झाला नसला तरी देखील चांदीने यापूर्वीच चांगलीच मुसळी घेतली आहे. त्यामुळे आता गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 99,500 रुपये इतका आहे.

News Title : 13 february 2025 Gold Silver Rate

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now