विद्यार्थ्यांनो सावधान! तुमच्या कॉलेजला NAAC मान्यता आहे का? महाविद्यालयांची यादी जाहीर

On: August 5, 2025 11:18 AM
Pune University
---Advertisement---

NAAC list 2025 | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न ११६ महाविद्यालयांवर आता संशयाची नजर टाकली जात आहे. कारण या सर्व महाविद्यालयांनी अद्याप ‘नॅक’ (NAAC) मूल्यांकन करून घेतलेले नाही. या मूल्यांकनाचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दर्जावर आणि भविष्यातील संधींवर थेट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी सावध राहण्याची गरज आहे.

पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील या महाविद्यालयांची यादी पुणे विद्यापीठाने नुकतीच जाहीर केली आहे. नाशिक जिल्ह्यातील २६ महाविद्यालयांचा त्यात समावेश असून, त्यातील ११ शहरातील आणि १५ ग्रामीण भागातील आहेत. (NAAC list 2025)

NAAC मूल्यांकन का महत्त्वाचं? :

NAAC (National Assessment and Accreditation Council) हे शिक्षण संस्थेच्या दर्जाचे मूल्यमापन करणारे राष्ट्रीय संस्था आहे. यामध्ये शिक्षण पातळी, अधिव्याख्याता, विद्यार्थीसंख्या, परीक्षा निकाल, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या रोजगाराच्या संधी आदी घटकांचा तपास केला जातो. त्यानुसार संबंधित महाविद्यालयाचा दर्जा निश्चित होतो.

NAAC मान्यता नसलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांच्या पदव्याची किंमत कमी होऊ शकते. याशिवाय, पुढील शिक्षण, शिष्यवृत्ती, किंवा सरकारी नोकरीसाठी अर्ज करताना अडथळे निर्माण होऊ शकतात.

NAAC list 2025 | नाशिकमधील NAAC नसलेल्या महाविद्यालयांची यादी :

– के. के. वाघ परफॉर्मिंग आर्ट कॉलेज

– स्मिताताई हिरे कॉलेज ऑफ अप्लाइड अँड परफॉर्मिंग आर्ट

– के. के. वाघ कॉलेज ऑफ फाइन आर्ट

– प्रशांतदादा हिरे कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी

– प्रशांतदादा हिरे विधी महाविद्यालय

– पीव्हीजी कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च

– समर्थ शिक्षणशास्त्र महाविद्यालय

– मातोश्री कॉलेज ऑफ एज्युकेशन

– ब्रह्मा व्हॅली आर्ट, कॉमर्स व सायन्स कॉलेज

– जनता सेवा मंडळ मॉडर्न कॉलेज

– एनएसपीएम आर्ट व कॉमर्स रात्र महाविद्यालय

विद्यापीठाची कारवाई आणि पुढील धोरण :

विद्यापीठाने २०२३ मध्ये अशा ३४२ महाविद्यालयांची यादी तयार केली होती, ज्यांनी NAAC प्रक्रिया पूर्ण केली नव्हती. त्यानंतर पाठपुरावा करून ही संख्या १०० च्या घरात आली. आता पुन्हा विद्यापीठाने ११६ संस्थांची यादी जाहीर करत त्यांना तत्काळ नोंदणी करण्याचे निर्देश दिले आहेत. (NAAC list 2025)

विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी स्पष्ट केले आहे की, “ही प्रक्रिया आता पुन्हा सुरू होत असून, संबंधित महाविद्यालयांनी NAAC साठी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.” मूल्यांकनास टाळाटाळ करणाऱ्या संस्थांवर भविष्यात प्रवेशबंदीसारखे कठोर निर्णय घेण्याचा इशाराही यावेळी दिला गेला.

News Title: 116 Colleges Under Pune University Lack NAAC Accreditation; Is Your College on the List?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now