मेष : आज चा दिवस साधारण जाईल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य साधारण राहणार असून, बाहेर खाणे टाळावे. अतिखर्चामुळे चिंता वाढेल. वाणीवर नियंत्रण ठेवणे आज आवश्यक आहे. कामासंदर्भात महिला सहकार्य प्राप्त होईल. मनात नकारात्मक विचार येण्याची शक्यता. तरीही मन शांत ठेवल्यास दिवस चांगला जाईल.
वृषभ : आजचा एकंदरीत दिवस छान असणार आहे. मानसिक व शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. आज उत्साह आणि चौकसता राहील. कामात विशेष एकाग्रता दिसून येईल. आज कामात उत्तम प्रदर्शन कराल आणि आत्मविश्वास वाढेल. आज तुम्हाला धनलाभ होऊन तुमचे आर्थिक समीकरण व्यवस्थित होण्यास मदत होईल. कुटुंबासोबत आनंददायी वेळ जाईल.
मिथुन : आजी आपणास आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे अन्यथा आपल्या वक्तव्यामुळे गौरसमज होतील. आज आपले स्वस्थ साधारण राहील. डोळ्याची विशेष काळजी घ्यावी. एखादा अपघात होण्याची शक्यता त्यामुळे सावध राहणे आवश्यक आहे. आर्थिक खर्च होण्याची शक्यता आहे. दिवस चिंतेत जाईल. मानसिक शांततेसाठी प्रयत्नशील राहा.
कर्क : आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. नोकरी अथवा व्यवसायासाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल. मित्रांकडून विशेषतः स्त्रीवर्गाकडून मदत होईल. मित्रांसोबत फिरण्याचा योग्य आहे. प्रिय व्यक्तींसोबत चांगला वेळ जाईल. इच्छुकांचे विवाह जमण्याचे योग आहेत. स्वास्थ्य चांगले राहील.
सिंह : आज तुम्हला कामात उशिरा यश मिळेल. कोणतेही नवीन संबंध स्थापित करणे टाळा. तसेच कामासंबंधित निर्णय घेणे टाळा. आज अचानक जबाबदाऱ्यांचे ओझे जाणवेल आणि तणाव वाढल्याचा अनुभव होईल. शुभकार्य करण्यास आज परिस्थिती अनुकूल आहे.
कन्या : आज थकवा, आळस आणि चिंता जाणवेल. संतती बरोबर मतभेद होऊ शकतात. तसेच त्यांच्यासोबत मतभेदही होऊ शकतात. नोकरीत वरिष्ठांशी वाद होईल. राजनैतिक संकटचा सामना करावा लागू शकतो. प्रवासासाठी किंवा कार्यासाठी खर्च होईल.
तुळ : आज स्वास्थाची काळजी घ्या. घालून बोलणे टाळा. वादविवाद होण्याची शक्यता. क्रोधावर संयम ठेवा. हितशत्रू सरसावतील. वेळेवर जेवण न मिळणे किंवा खर्च वाढणे अश्या कारणावरून अस्वस्थता वाढेल. अचानक धनलाभ होणार आहे. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. पाण्यापासून राहणे योग्य राहील. अपघात होण्याची शक्यता.
वृश्चिक : आज नोकरी व व्यवसायातून भरपूर लाभ होईल. तसेच मित्र नातेवाईक आणि लोकांकडून लाभ होईल. सामाजिक कार्यक्रमात जाऊ शकता तसेच पर्यटनासाठी योग चांगला आहे. आज एकंदरीतच तुम्ही आनंदी राहाल आणि लाभ होईल. विवाहेच्छुकांसाठी देखील योग चांगला आहे.
धनु : आजचा दिवस नोकरदारांसाठी फायदेशील ठरेल. आर्थिक लाभाची शक्यता. आज आनंदाचे वातावरण राहील. सहकारांची मदत मिळेल. कार्यात सफलता मिळणार असून, प्रतिस्पर्धी किंवा विरोधकांवर मात करु शकाल.
मकर : आज साहित्य आणि कला क्षेत्रातील लोक चांगली कामगिरी करतील. आपल्या सृजनशील आणि रचनात्मक गुणांची इतरांना ओळख द्याल. प्रेमिकांना गाढ प्रेमाचा अनुभव येईल आणि रोमांचक भेटीचा योग. शेयर मार्केट मध्ये लाभ होईल. मित्रांकडून लाभ होईल आणि संततींसोबतचे वाद मिटतील.
कुंभ : आज स्वभाव जास्त हलवा राहील आणि मानसिक अस्वस्थता राहील. आर्थिक नियोजन कराल. आईकडून अधिक प्रेमाचा वर्षाव होईल. स्त्रिया सौंदर्य, अलंकार आणि इतर वस्तूंवर अधिक खर्च करतील. विद्यार्थ्यांचा लाभ होईल. स्वभावात हट्टीपणा जाणवेल. सार्वजनिक परिस्थितीत मानहानी होण्याची शक्यता.
मिन : आजचा तुमचा दिवस कार्य करण्यासाठी आणि मोठे निर्णय घेण्यासाठी चांगला आहे. आज विचारात संयम राहील तसेच स्थिरता राहील. कोणतेही काम व्यवस्थित कराल. कलाकारांना कला प्रदर्शनाची संधी मिळेल. वैवाहिक जोडीदाराशी जवळीक वाढेल.






