पुणेकरांसाठी धोक्याची घंटा; ‘या’ भागातील दोन गर्भवती महिलांना झाली झिकाची लागण

Pune News l महाराष्ट्रातील पुणे शहरात झिका विषाणूचे सहा रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांमध्ये दोन गर्भवती महिलांचाही समावेश असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. एरंडवणे परिसरातील २८ वर्षीय गर्भवती महिलेला झिका विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

महापालिकेने फॉगिंग केले सुरू :

एका अधिकाऱ्याने सांगितले की, दोन्ही महिलांची प्रकृती ठीक असून त्यांना कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. गर्भवती महिलांमध्ये, झिका विषाणूमुळे गर्भामध्ये मायक्रोसेफली होऊ शकते. झिका विषाणू संसर्गाचा पहिला रुग्ण एरंडवणे येथे आढळून आला, जेव्हा 46 वर्षीय डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्यांच्या 15 वर्षांच्या मुलीचा नमुनाही पॉझिटिव्ह आला आहे.

अधिकाऱ्याने सांगितले की, मुंढवा येथेही 47 वर्षीय महिला आणि 22 वर्षीय पुरुषाला झिका व्हायरसची लागण झाली आहे. झिका विषाणू रोग संक्रमित एडिस डासाच्या चाव्याव्दारे पसरतो, ज्याला डेंग्यू आणि चिकुनगुनिया यांसारखे संक्रमण देखील पसरते.1947 मध्ये युगांडामध्ये हा विषाणू पहिल्यांदा ओळखला गेला. अशातच आता पुणे महापालिकेचा आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे. ते म्हणाले की, खबरदारीचा उपाय म्हणून डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी फॉगिंग, फ्युमिगेशन यासारख्या उपाययोजना केल्या जात आहेत.

Pune News l झिका व्हायरस कसा पसरतो? :

झिका विषाणू एडिस इजिप्ती आणि अल्बोपिक्टस या संक्रमित डासांच्या चाव्याव्दारे पसरतो. हा विषाणू लैंगिक संपर्काद्वारे, रक्ताच्या संसर्गाद्वारे किंवा प्रसूतीदरम्यान संक्रमित मातेकडून मुलामध्ये प्लेसेंटाद्वारे खूप वेगाने पसरतो. म्हणून, गर्भवती महिलेने पहिल्या तिमाहीत अल्ट्रासाऊंड स्क्रीनिंग करताना सावधगिरी बाळगली पाहिजे.

साधारणपणे, झिका विषाणूची लागण झालेल्या 80 टक्के लोकांमध्ये कोणताही संसर्ग दिसून येत नाही, परंतु जर एखाद्याला ताप, पुरळ, सांधे आणि स्नायू दुखणे, डोकेदुखी किंवा डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह वाटत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. ही लक्षणे संक्रमित डास चावल्यानंतर एक आठवड्यानंतर दिसतात आणि सुमारे एक आठवडा टिकू शकतात.

News Title – Zika Virus In Pune

महत्त्वाच्या बातम्या- 

या राशीच्या व्यक्तींनी वाहन चालवताना काळजी घ्यावी

विधानपरिषदेत राडा; दानवेंनी प्रसाद लाडांना दिली शिवी, म्हणाले ‘ए मा****’

“हा माझा विजय तितकाच तुझाही विजय”, विराटची अनुष्कासाठी भावुक पोस्ट

मोठी बातमी! लोकसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडेंची थेट विधान परिषदेवर वर्णी

‘या’ भागात पावसाने घातलं थैमान, रस्त्यावर अचानक मगरी आल्याने भीतीचं वातावरण