Yuzvendra Chahal | भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. नुकत्याच झालेल्या क्रिकेट सामन्यात तो एका मिस्ट्री गर्लसोबत दिसला, ज्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. धनश्री वर्मा (Dhanashree Verma) सोबत घटस्फोटानंतर चहलच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.
मिस्ट्री गर्ल कोण?
टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात चहल स्टेडियममध्ये एका अनोळखी तरुणीसोबत बसलेला दिसला. यानंतर अनेक चाहत्यांनी अंदाज लावायला सुरुवात केली की, चहल नव्या नात्यात आहे का? काहींनी तर या मिस्ट्री गर्लला “नवी वहिनी” म्हणत सोशल मीडियावर मीम्स देखील शेअर केले.
मात्र, चहलसोबत दिसलेली ही तरुणी दुसरी-तिसरी कुणी नसून लोकप्रिय यूट्यूबर आणि रेडिओ जॉकी RJ महवश (Mahvash) आहे. महवशला यापूर्वी देखील चहलसोबत पाहिले गेले होते, तेव्हाही त्यांच्या डेटिंगच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र, महवशने त्या वेळी हे वृत्त फेटाळले होते.
चहलच्या आयुष्यात नवे प्रेम?
युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि धनश्री वर्मा यांनी 2020 मध्ये लव्ह मॅरेज केले होते. मात्र, चार वर्षांनी त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर चहल पहिल्यांदाच कोणाशी तरी इतका सहज वावरताना दिसल्याने चर्चांना उधाण आले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये चहल आणि महवश सामना पाहताना हसत-गप्पा मारताना दिसत आहेत. महवश ही एक प्रसिद्ध RJ असून, इंस्टाग्रामवर तिचे 1.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. त्यामुळे चाहत्यांचे लक्ष आता त्यांच्या नात्यावर आहे.
Title : Yuzvendra Chahal Spotted with Mystery Girl Sparks Dating Rumors






