युजवेंद्र चहलच्या खाजगी आयुष्यासंदर्भात मोठी अपडेट्स!

On: January 27, 2026 7:29 PM
Yuzvendra Chahal
---Advertisement---

Yuzvendra Chahal | भारतीय क्रिकेट संघाचा स्टार लेगस्पिनर युजवेंद्र चहल हा सध्या मैदानावरील कामगिरीपेक्षा त्याच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आहे. 2025 मध्ये पत्नी धनश्री वर्मा हिच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर चहलच्या आयुष्यात अनेक नवे वळण आले असून आता पुन्हा एकदा त्याच्या नातेसंबंधांबाबत मोठी चर्चा रंगताना दिसत आहे. सोशल मीडियावर सुरू असलेल्या घडामोडींमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

धनश्री वर्मा हिच्यासोबत चार वर्षांचे वैवाहिक आयुष्य संपल्यानंतर चहलचे नाव आरजे महवश हिच्यासोबत जोडले जात होते. दोघे अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले होते, तसेच लंडनमध्ये खास वेळ घालवल्यामुळे त्यांच्या नात्याबाबत लग्नाच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या. मात्र, अचानक सोशल मीडियावर दोघांनीही एकमेकांना अनफॉलो केल्यानंतर पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. (Chahal Divorce)

आरजे महवशशी दुरावा, सोशल मीडियावर आरोप :

आरजे महवश हिने युजवेंद्र चहलविरोधात सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत काही गंभीर आरोप केल्याचे समोर आले आहे. या पोस्टमुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे स्पष्ट होत असून, चाहत्यांमध्ये विविध अंदाज वर्तवले जात आहेत. मात्र, या प्रकरणावरून अद्याप दोघांकडूनही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

धनश्री वर्मा हिच्यासोबतच्या घटस्फोटानंतर चहल आणि महवश यांचे नाते बहरात असल्याचे चित्र दिसत होते. स्टेडियममध्येही दोघे एकत्र स्पॉट झाले होते. त्यामुळे हे नाते लग्नापर्यंत पोहोचेल, अशी चर्चा सुरू होती. मात्र, अचानक अनफॉलो आणि आरोपांच्या पोस्टमुळे त्यांच्या नात्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Yuzvendra Chahal | शेफाली बग्गासोबत स्पॉट; नवा चर्चेचा विषय :

या सगळ्या घडामोडींमध्ये युजवेंद्र चहल अलीकडे अभिनेत्री आणि बिग बॉस फेम शेफाली बग्गा हिच्यासोबत स्पॉट झाला. दोघे एकत्र दिसल्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा चर्चांना उधाण आले असून, चहल शेफाली बग्गाला डेट करत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. काही व्हिडीओ आणि फोटोमध्ये दोघेही आनंदी दिसत असल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.

याचदरम्यान चहलने सोशल मीडियावर शेअर केलेली एक पोस्टही चर्चेचा विषय ठरली आहे. “विषय कधी वेळेचा नसतो, तर तो प्राथमिकतेचा असतो. एखादी गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची असेल, तर त्यासाठी तुम्ही वेळ नक्कीच काढता,” असा मजकूर असलेली पोस्ट शेअर करताच चाहत्यांनी याचा संबंध त्याच्या खासगी आयुष्याशी जोडला आहे. अनेकजण ही पोस्ट आरजे महवशसाठीच असल्याचा अंदाज व्यक्त करत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) हा त्याची एक्स पत्नी धनश्री वर्मा हिच्यासोबतही स्पॉट झाला होता. त्यामुळे त्याच्या आयुष्यात नेमकं काय सुरू आहे, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, या सर्व चर्चांदरम्यान चहलने स्वतःकडून कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया दिलेली नसल्यामुळे अफवांना आणखी खतपाणी मिळत आहे.

News Title: Yuzvendra Chahal Personal Life in Turmoil After Divorce, Breakup with RJ Mahvash?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now