चहल-धनश्री वर्माचा घटस्फोट?; पोटगीची रक्कम ऐकून व्हाल थक्क

On: February 21, 2025 4:05 PM
Yuzvendra Chahal
---Advertisement---

Yuzvendra Chahal | भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) सध्या पत्नी धनश्री वर्मासोबतच्या (Dhanashree Verma) कथित घटस्फोटामुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर (social media) दोघांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू आहे. घटस्फोट झाल्यास चहलला धनश्रीला किती पोटगी द्यावी लागेल, याचे अंदाज बांधले जात आहेत. एका रिपोर्टनुसार, धनश्रीला तब्बल 60 कोटी रुपये द्यावे लागतील, अशी माहिती समोर आली आहे.

चहल आणि धनश्रीची प्रतिक्रिया

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान, चहलने या अफवांवर दुःख व्यक्त केले आहे, तर धनश्रीने हे दावे निराधार असल्याचे म्हटले आहे. तसेच, लोकांनी यात पडू नये, असे आवाहन केले आहे. इन्स्टाग्रामवर (Instagram) दोघांनी एकमेकांना अनफॉलो (unfollow) केल्यापासून ही चर्चा सुरू झाली आणि आता घटस्फोटाच्या अंदाजापर्यंत पोहोचली आहे.

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा विवाह डिसेंबर 2020 मध्ये गुरुग्राम (Gurugram) येथे झाला होता. कोरोना काळात (corona period) डान्स (dance) शिकण्यासाठी चहलने धनश्रीशी संपर्क साधला आणि ते एकमेकांना भेटले. पण, सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेनुसार, दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे.

घटस्फोटाच्या वृत्तावर शिक्कामोर्तब?

चहल किंवा धनश्रीकडून त्यांच्या नात्याबद्दल किंवा घटस्फोटाबद्दल अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही, पण धनश्रीने निराधार गोष्टी आणि ट्रोलिंगवर (trolling) टीका केली आहे. अशातच, एक माहिती अशीही येत आहे की, युजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर-यूट्यूबर (choreographer-youtuber) धनश्री वर्मा यांचा आता अधिकृत घटस्फोट झाला आहे. वृत्तानुसार, या दोघांनी गुरुवारी वांद्रे कुटुंब न्यायालयात (Bandra Family Court) कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्या. (Yuzvendra Chahal)

4 वर्षांचे नाते संपुष्टात

गेल्या 18 महिन्यांपासून दोघेही एकमेकांपासून वेगळे राहत होते. चहल आणि धनश्री वर्मा यांनी आता अधिकृतपणे त्यांचे लग्न संपवले आहे. घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते आता पती-पत्नी राहिलेले नाहीत. वांद्रे कुटुंब न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निर्णयानंतर हे नाते कायमचे तुटले आहे. 2020 मध्ये लग्न झालेल्या धनश्री-युजवेंद्र चहल यांच्या लग्नाला 4 वर्ष झाली होती, यानंतर हे नाते संपुष्टात आले असल्याची माहिती आहे.

Title : Yuzvendra Chahal-Dhanashree Verma Divorce Alimony Amount Revealed 

 

Join WhatsApp Group

Join Now