घटस्फोट झाल्यास चहलच्या बायकोला ‘इतक्या’ कोटींची पोटगी मिळणार?

On: January 5, 2025 2:38 PM
Yuzvendra  Chahal
---Advertisement---

Yuzvendra  Chahal And Dhanashree Verma | भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यात काही आलबेल नसल्याचं समोर येत आहे. युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने (Yuzvendra  Chahal And Dhanashree Verma) इन्स्टाग्रामवरुन एकमेकांना अनफॉलो देखील केले आहे. त्यामुळे दोघांच्या घटस्फोटांच्या चर्चांना उधाण आले आहे.

धनश्री आणि चहलच्या संदर्भात सोशल मीडियावर अनेक पोस्ट पाहायला मिळाल्या. दोघांचा घटस्फोट होत असल्याचा दावा केला जात आहे. अशत दोघांचा घटस्फोट झाल्यास चहलची बायको धनश्री वर्माला किती पोटगी मिळणार याबाबत चर्चा सुरू आहेत.

धनश्री वर्माला ‘इतक्या’ कोटींची पोटगी?

युझवेंद्रची एकूण मालमत्ता 45 कोटी रुपये आहे. युझवेंद्र ब्रँड एंडोर्समेंटच्या माध्यमातूनही करोडोंची कमाई करतो. तर पत्नी धनश्री एक व्यावसायिक नृत्यांगना आहे. ती अनेक टीव्ही शोमध्ये दिसली आहे. धनश्रीलाही चांगले उत्पन्न मिळते. धनश्रीला चहलकडून पोटगी हवी असल्यास ती याबाबत न्यायालयात जाऊ शकते.

साधारणपणे घटस्फोटाच्या खटल्यात पतीच्या कमाईची अथवा एकूण संपत्तीच्या 25 टक्क्यांपर्यंत वाटा हा पत्नीला पोटगी म्हणून दिला जातो. त्यामुळेच धनश्रीनं पोटगी मागितल्याच 25 टक्क्याच्या हिशोबानं चहलला 20 कोटींपर्यंत पोटगी द्यावी लागू शकते.

धनश्री वर्मा कोण?

धनश्री वर्मा एक यूट्यूबर आहे. ती डान्सर, कोरिओग्राफर आणि एक सोशल मीडिया एन्फ्लूएंझरही आहे. यूट्यूबवर तिच्या डान्स व्हिडीओंनी लाखो व्ह्यूज मिळतात. तिचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. धनश्री अनेकदा लोकप्रिय बॉलिवूड गाण्यांचं नृत्यदिग्दर्शन करत व्हिडीओ पोस्ट करत असते.

धनश्री वर्माची एकूण संपत्ती 25 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. वेगवेगळ्या ब्रँड्सच्या जाहिराती करते. याच जाहिराती करण्याचे ती कोट्यवधी रुपये घेते.

महत्त्वाच्या बातम्या- 

प्रयागराज कुंभमेळ्यात ‘या’ बाबांनी वेधलं सर्वांचं लक्ष, तब्बल 32 वर्ष केली नाही अंघोळ!

“देवेंद्रजी, धस यांना जाब विचारणार की बेभान सुटलेला बैल आणखी मोकाट सोडणार?”

चीनमध्ये नव्या व्हायरसचा धुमाकूळ; WHO ने दिली अत्यंत धक्कादायक बातमी

लाडकी बहीण योजनेचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना; स्वतः कृषिमंत्र्यांनी दिली कबुली

रिक्षाचालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा नियम लागू; …नाहीतर परवाना होणार रद्द!

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now