युवासेना सचिव दुर्गा भोसले-शिंदेंचा अचानक मृत्यू!

On: April 6, 2023 3:06 PM
---Advertisement---

मुंबई | युवासेना सचिव दुर्गा भोसले-शिंदे (Durga Bhosale Shinde) यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे. वयाच्या 30 व्या वर्षी दुर्गा भोसले यांच निधन झालं आहे. त्यांच्या मागे पती, आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे.

युवा सेनेच्या सचिव दुर्गाताई भोसले या मुंबईच्या कंबाला हिल परिसरात राहतात. त्या अवघ्या 30 वर्षाच्या आहेत. त्या मोर्चासाठी काल ठाण्यात आल्या होत्या. मोर्च्यात मोर्चेकऱ्यांसोबत त्या चालत होत्या. सरकार विरोधात त्याही घोषणा देत होत्या, घोषणा देत असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं.

छातीत दुखू लागल्याने त्यांना वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी तातडीने विश्रांती घेण्यास सागितलं. त्यांना तात्काळ उपचारासाठी मुंबईला पाठवलं. दुर्गाताई यांना लगेचच बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचारही सुरू करण्यात आले.

उपचार सुरू असतानाच काल रात्री 1.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झाल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now