‘जिंकलोच असतो, पण पनवतीने हरवलं’; राहुल गांधींची मोदींवर टीका

On: November 22, 2023 1:34 PM
---Advertisement---

नवी दिल्ली | सत्ताधारी आणि विरोधक काही न काही विषयांवरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसतात. अशात काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) टीका केली आहे. त्यांनी थेट नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पनवती म्हटलं आहे.

भाजपने राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही जालोरमध्ये मोठी रॅली केली. यावेळी त्यांनी वर्ल्ड कप सामन्याचा उल्लेख करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे.

राहुल गांधींची मोदींवर टीका

काहीही असेल आपली टीम जिंकली असती. पण पनवतीने पराभूत केलं, असं राहुल गांधी यांनी म्हटलंय. राहुल गांधी यांचं भाषण सुरू होताच सभेला आलेल्या लोकांनी पनवती. पनवती अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यावर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी हे वक्तव्य केलं आहे.

बरं वाईट काही का असेना आपली टीम जिंकली असती. पण पनवतीने पराभूत केलं. टीव्हीवाले हे बोलणार नाही. पण जनतेला सर्व माहीत आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

पुढील 24 तासांत राज्याच्या ‘या’ भागात पावसाचा अंदाज 

अंतरवलीतील हल्ला प्रकरणी मनोज जरांगेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!

जरांगेंनी केला नवा खुलासा; राजकीय वर्तुळात खळबळ

पुण्यात धडकी भरवणारा अपघात, पाहा व्हिडीओ

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा झटका! 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now