वरळी ‘हिट अँड रन’ प्रकरणी मोठी अपडेट; शिवसेनेचा उपनेता पोलिसांच्या ताब्यात

On: July 7, 2024 11:55 AM
---Advertisement---

Worli Hit And Run Accident | मुंबईत आज (7 जुलै) पहाटेच एक भीषण अपघात घडला. या प्रकारामुळे मुंबई हादरून गेली आहे. भल्या पहाटेच भरधाव कारमुळे मुंबईत एका महिलेला प्राण गमवावा लागला. वरळीमध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे. या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे.

या प्रकरणी शिवसेनेच्या शिंदे गटातील (Shinde Group) उपनेते राजेश शहा (Rajesh Shah) यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राजेश शहा हे पालघरमधील शिवसेनेचे उपनेते असून अपघात झाला त्यावेळी राजेश शहा गाडीमध्ये नव्हते. तर, त्यांचा मुलगा आणि ड्रायव्हर गाडीत होते.

आरोपी मुलगा सध्या फरार असून पोलिसांकडून आरोपी मुलगा आणि ड्रायव्हर यांचा शोध घेतला जात आहे. पांढऱ्या रंगाच्या बीएमडब्ल्यू (White BMW Car) गाडीत राजेश शहा यांचा मुलगा आणि (Worli Hit And Run Accident ) ड्रायव्हर होते.

पोलिसांनी ही गाडी ताब्यात घेतली असून त्यावर एका पक्षाचं चिन्ह असल्याची माहिती समोर आली आहे. तसंच अपघातानंतर ते चिन्ह खोडण्याचा प्रयत्न झाल्याचं देखील समोर आलंय. या प्रकरणी आता पोलिस कसून तपास करत आहेत.

नेमकं काय घडलं?

वरळीमध्ये मच्छी आणण्याठी गेलेल्या कोळी दांपत्याला पहाटे साडे पाच वाजता चार चाकीने फरफटत नेल्याची माहिती समोर आली आहे. वरळीतील ॲट्रीया मॉलजवळ ही घटना घडली आहे. वरळी (Worli Hit And Run Accident)कोळीवाडा परिसरात राहणारे नाकवा दांपत्य हे सकाळी ससून डॉकला मच्छी आणण्यासाठी गेले होते. मच्छी घेऊन परतत असताना एका चारचाकीने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली.

कोळी दांपत्य दुचाकीवर मोठ्याप्रमाणात मच्छी वाहून नेत असल्याने त्यांच्या दुचाकीचे नियंत्रण सुटले आणि दोघंही चार चाकीच्या बोनटवर जाऊन पडले. त्यावेळी वेळीच नवऱ्याने कारच्या (Worli Hit And Run Accident ) बोनटवरून बाजूला उडी टाकली. पण, महिलेला तेथून बाजूला होता आलं नाही. याचवेळी घाबरलेल्या चालकाने कार न थांबवता सुसाट पळवली आणि त्यात कोळी महिला फरफटत गेली. यात महिलेचा मृत्यू झाला आहे.

News Title – Worli Hit And Run Accident update 

महत्त्वाच्या बातम्या-

आनंदवार्ता! ‘या’ शहरात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त; जाणून घ्या नवीन दर

“बर्थडे मुबारक हो कप्तान साहब…”; MS धोनीच्या वाढदिवशी सलमान खानची खास पोस्ट

आज ‘या’ राशींच्या धनसंपत्तीत अचानक वाढ होईल!

‘हिट अँड रन’ च्या घटनेने मुंबई हादरली; गाडीखाली चिरडून महिलेचा मृत्यू, चालक फरार

पहाटे फक्त 20 मिनिटे चालण्याने काय होईल?, उत्तर ऐकून हैराण व्हाल

Join WhatsApp Group

Join Now